Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्वचेसाठी वरदान ठरतं तुरटी आणि मधाचं 'हे' खास मिश्रण, दिवसातून एकदा लावलं तरी पुरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:45 IST

Honey And Alum For Skin : त्वचेवर रॅशेज, घामोळ्या, पिंपल्स आणि ड्रायनेस दिसू लागते. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही पावसाळ्यात तुरटी आणि मधाचा रामबाण उपाय करू शकता.

Honey And Alum For Skin : पावसाळ्यात त्वचा डॅमेज होण्याचा धोका अधिक असतो. अशात त्वचेची काळजी अधिक घ्यावी लागते. या दिवसांमध्ये घाम, उन्ह, प्रदूषण आणि बॅक्टेरियानं त्वचेचं अधिक नुकसान होतं. त्वचेवर रॅशेज, घामोळ्या, पिंपल्स आणि ड्रायनेस दिसू लागते. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही पावसाळ्यात तुरटी आणि मधाचा रामबाण उपाय करू शकता. अशात तुरटी आणि मध कसं लावावं आणि याचे फायदे काय होतात हे जाणून घेऊ.

त्वचा राहते हेल्दी

तुरटीमध्ये अ‍ॅंटी-सेप्टिक गुण भरपूर असतात. तुरटीनं त्वचेवर इन्फेक्शन पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. त्वचेवरील पिंपल्स आणि अ‍ॅक्नेसारख्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही तुरटी आणि मधाचं मिश्रण लावू शकता.

रोमछिद्रांची स्वच्छता

मोकळ्या रोमछिद्रांमध्ये मळ आणि सीबम जमा होऊ लागतं. ज्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा फोड येतात. अशात त्वचेवर मध आणि तुरटीचं मिश्रण लावलं तर स्किन पोर्सची स्वच्छता होण्यास मदत मिळते.

सुरकुत्या जातील

मध आणि तुरटीचा फेसपॅक लावल्यानं त्वचा टाइट होते. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्सही दूर होतात. ज्यामुळे त्वचा जास्त काळ तरूण दिसते.

ड्राय स्किन होईल सॉफ्ट

मधानं त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा हायड्रेट राहते. ज्यामुळे त्वचेतील कोरडेपणा कमी होऊन त्वचा मुलायम होते.

कसं लावाल?

एक चमचा तुरटीचं पावडर घ्या आणि त्यात एक चमचा मध टाका. दोन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्या. ही पेस्ट त्वचेवर लावा. २० मिनिटं तशीच राहू द्या नंतर साध्या पाण्यानं त्वचा धुवा.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स