Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > फक्त २० रुपयांत घरच्याघरी मिळेल मुलायम-चमकदार त्वचा, महागड्या प्रॉडक्टपेक्षा भारी उपाय

फक्त २० रुपयांत घरच्याघरी मिळेल मुलायम-चमकदार त्वचा, महागड्या प्रॉडक्टपेक्षा भारी उपाय

Glowing Skin Home Remedies : केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी तुम्ही काही घरगुती उपाय करूनही तुम्ही त्वचेवरील काळे डाग दूर करू शकता. असाच एक सोपा आणि कमी खर्चाचा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:31 IST2025-06-03T14:25:57+5:302025-06-03T19:31:45+5:30

Glowing Skin Home Remedies : केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी तुम्ही काही घरगुती उपाय करूनही तुम्ही त्वचेवरील काळे डाग दूर करू शकता. असाच एक सोपा आणि कमी खर्चाचा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Beasan and honey face pack fro glowing skin you should try | फक्त २० रुपयांत घरच्याघरी मिळेल मुलायम-चमकदार त्वचा, महागड्या प्रॉडक्टपेक्षा भारी उपाय

फक्त २० रुपयांत घरच्याघरी मिळेल मुलायम-चमकदार त्वचा, महागड्या प्रॉडक्टपेक्षा भारी उपाय

Glowing Skin Home Remedies : उन्हामुळे त्वचेचं किती नुकसान होत हे काही कुणाला सांगायची गरज नाही. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचा काळवंडते. त्वचेवर डाग पडतात. अशात यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर केला जातो. पण यांनी फायदा मिळतोच असं नाही. या उत्पादनांच्या वापरानं अनेकांना नुकसानही होतं. अशात केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी तुम्ही काही घरगुती उपाय करूनही तुम्ही त्वचेवरील काळे डाग दूर करू शकता. असाच एक सोपा आणि कमी खर्चाचा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

त्वचा चमकदार करण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय बेसन मानला जातो. अनेक वर्षांपासून बेसनाचा वापर चेहरा चमकदार आणि साफ करण्यासाठी केला जातो. पण अनेकांना बेसनाचा वापर कसा करावा याची माहिती नसते. तुम्हाला जर फक्त 20 रूपयाच चेहरा चमकदार करायचा असेल तर हा उपाय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

बेसन आणि मधाचं बेस्ट कॉम्बिनेशन

घरातील वृद्ध लोक कितीही लाख सांगतिल पण अनेकांना हे माहीत नसतं की, बेसन एक नॅचरल क्लींजर आहे. जे त्वचा आतपर्यंत साफ करतं. त्वचेवरील जास्तीचं तेल शोषूण घेतं आणि त्वचेला फ्रेश ठेवतं. बेसनातील अॅंटी-ऑक्सि़डेंट्स त्वचेतील टॉक्सिन्स नष्ट करतं आणि पोर्स टाइट करतात. तर मधातील नॅचरल तत्वांमुळे त्वचा मुलायम आणि हाइयड्रेट राहते. तसेच मधानं त्वचेच्या इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो.

कसं बनवाल आणि लावाल?

सगळ्यात आधी एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या आणि त्यात 1 चमचा मध टाका. नंतर त्यात थोडं गुलाबजल टाका किंवा कच्च दूधही टाकू शकता. या गोष्टी चांगल्या मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवा.

बेसन आणि मधाच्या पेस्टनं त्वचेला अनेक फायदे मिळतात. बेसन त्वचेची आतपर्यंत स्वच्छता करतं, डेड स्किन दूर करतं आणि अतिरिक्त तेलही दूर करतं. तर मध त्वचेला मॉइश्चराइज करतं. या फेसपॅकनं त्वचेवरील टॅनिंग कमी होते, पिंपल्स आणि डागही दूर होतात. चेहरा नॅचरली ग्लो करतो. नियमितपणे हा उपाय कराल तर तुम्हाला महागडे प्रोडक्ट वापरण्याची गरज पडणार नाही.

काय काळजी घ्याल?

हा एक नॅचरल उपाय आहे आणि त्वचा चमकदार व साफ करण्याचं काम करतो. पण जर तुम्हाला त्वचेसंबंधी काही गंभीर समस्याअसेल तर हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल किंवा कशाप्रकारची अॅलर्जी असेल तेव्हाही हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Web Title: Beasan and honey face pack fro glowing skin you should try