lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > डार्क सर्कल्समुळे चेहरा वयस्कर दिसतोय? केळीचे साल वापरा आणि डार्क सर्कल कायमचे घालवा

डार्क सर्कल्समुळे चेहरा वयस्कर दिसतोय? केळीचे साल वापरा आणि डार्क सर्कल कायमचे घालवा

Banana Peels for Dark Circles : केळ्याच्या सालीमध्ये एंटी मायक्रोबियल आणि एंटी बॅक्टेरियअल गुणधर्म असतात. ज्यामुळे बॅक्टेरियल इंन्फेक्शन आणि रिएक्शन कमी होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 03:09 PM2023-05-30T15:09:51+5:302023-05-31T11:12:16+5:30

Banana Peels for Dark Circles : केळ्याच्या सालीमध्ये एंटी मायक्रोबियल आणि एंटी बॅक्टेरियअल गुणधर्म असतात. ज्यामुळे बॅक्टेरियल इंन्फेक्शन आणि रिएक्शन कमी होतात.

Banana Peels for Dark Circles : Home Remedies for Dark Circles and How to Use Them | डार्क सर्कल्समुळे चेहरा वयस्कर दिसतोय? केळीचे साल वापरा आणि डार्क सर्कल कायमचे घालवा

डार्क सर्कल्समुळे चेहरा वयस्कर दिसतोय? केळीचे साल वापरा आणि डार्क सर्कल कायमचे घालवा

सुंदर डोळे सौदर्यांत भर घालतात. पण डोळे कितीही सुंदर असले तरी डोळ्यांखालची काळी वर्तुळं लूक बिघडवतात. (Banana Peel for ark circles) डार्क सर्कल्समुळे वयाआधीच तुम्ही म्हातारे झाल्यासारखे दिसता आणि त्वचा काळपट दिसते. एकदा डार्क सर्कल्स यायला सुरूवात झाली की मेकअपशिवाय घराबाहेर पडणं कठीण होतं. (Tips for Eye Health and Maintaining Good Eyesight)

डार्क सर्कल्स लपवण्यासाठी चेहऱ्याला क्रिम्स, कन्सिलर, सन्सस्क्रीन, पावडर असं काहीना काही लावावं लागतं. (Treat dark circles and puffy eyes) डोळ्यांखालची काळी वर्तुळ घालवण्यासाठी तुम्ही केळ्याचा वापर करू शकता. (Banana Peels for Dark Circles) केळ्याच्या सालीमुळे डार्क सर्कल्स कायमचे दूर होऊ शकतात. यात पोटॅशियम, एंटी ऑक्सिडंट्स यांसारखे गुण असतात. (Home Remedies for Dark Circles and How to Use Them)

डोळ्यांवर केळ्याच्या सालीचा वापर कसा करावा

सगळ्यात आधी केळीचं साल घ्या आणि १५ ते २० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून डोळ्यांच्या खाली लावा. एकूण १५ मिनिटांपर्यंत तुम्ही ही सालं डोळ्यांच्या खाली लावू शकता त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून टाका. चांगल्या परीणामांसाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा. (Reduce Dark Circles And Wrinkles With Banana Peels)

गुडघ्यापर्यंत लांबचलांब वाढतील केस; १ कांदा वापरून लावा खास हेअर सिरम; दाट केसांचं सिक्रेट

दुसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेलची आवश्यकता असेल. सगळ्यात आधी केळ्याचं साल लहान तुकड्यांमध्ये कापा आणि त्यात एलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तयार झाल्यानंतर डोळ्यांच्या खाली लावा. १५ ते  २० मिनिटं असंच ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ  पाण्यानं धुवून टाका. 

तिसरा उपाय करण्यासाठी केळ्याच्या सालीची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस मिसळा आणि मधसुद्धा घाला. तयार पेस्ट डोळ्यांच्या खाली लावा. ही पेस्ट ८ ते १० मिनिटांसाठी तशीच ठेवा नंतर पाण्यानं स्वच्छ धुवून चेहरा साफ करा.  या उपायानं काळी वर्तुळ दूर होण्यास मदत होईल.

केळ्याच्या सालीमध्ये एंटी मायक्रोबियल आणि एंटी बॅक्टेरियअल गुणधर्म असतात. ज्यामुळे बॅक्टेरियल इंन्फेक्शन आणि रिएक्शन कमी होतात. एक्ने आणि पिंपल्स अनेकदा बॅक्टेरिअल इंन्फेक्शनचं कारण ठरतात. केळ्याच्या सालीचा त्वचेवर वापर केल्यास पिंपल्स कमी होण्यास मदत होते.  

रोज साफ केले तरी खिडक्या-दरवाज्यांवर धूळ बसते, घाण दिसतात? 3 टिप्स, घर राहील स्वच्छ

सगळ्यात आधी चेहरा धुवून घ्या नंतर टॉवेलनं हलक्या हातानं चेहरा  पुसा. चेहऱ्यावर धूळ,  माती राहणार नाही याची काळजी घ्या. केळ्याचे साल एक्ने असलेल्या भागावर लावा. ब्राऊन झाल्यानंतर हे साल काढून घ्या. थोड्या वेळासाठी तसंच राहू द्या. नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. 

Web Title: Banana Peels for Dark Circles : Home Remedies for Dark Circles and How to Use Them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.