थंडीच्या (Winter 2025) दिवसांत चेहरा काळा पडतो किंवा त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. ग्लोईंग त्वचेसाठी शहनाज हुसैन यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहे. त्यातीलच एक म्हणजे बनाना मास्क. हा मास्क करायला सोपा आहे आणि त्वचेला पोषण देऊन तात्काळ चमक आणण्यास मदत करतो. केळी पोटॅशियम, जीवनसत्वे आणि एंटी ऑक्सिडेंट्सचा समृद्ध स्त्रोत आहेत. (Banana Face Mask for Glowing Skin)
केळ्यातील नैसर्गिक तेल आणि आर्द्रता कोरड्या त्वचेला खोलवर पोषण देऊन मऊ आणि मुलायम बनवते. हा मास्क त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे नैसर्गिक चमक वाढते. केळ्यातील एंटी ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि अकाली वृद्धत्वाची चिन्ह जसं की सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. यात असलेले एंटी मायक्रोबिअल गुणधर्म मुरूमांची समस्या कमी करण्यास उपयुक्त ठरतात.
शहनाज हुसैन यांनी सांगतलेला बनाना मास्क करायला अगदी सोपा आहे. त्यात मध आणि दही, लिंबाचा रस घालून एकजीव करा आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. हा मास्क चेहर्यावर आणि मानेवर लावून ठेवा. डोळ्यांभोवतीचा नाजूक त्वचा सोडून द्या. हा मास्क जवळपास १० ते १५ मिनिटं चेहऱ्यावर राहू द्या. सुकल्यावर चेहरा कोमट पाण्यानं हळूवारपणे धुवा आणि हलक्या हातानं पुसून घ्या. हा साधा उपाय नियमितपणे केल्यास तुम्हाला काही दिवसांतच तुमच्या त्वचेमध्ये नैसर्गिक चमक आणि ताजेपणा जाणवेल.
मंगळसूत्र ब्रेसलेटच्या १० मिनिमलिस्टीक डिजाईन्स; हातात शोभून दिसणारा सुंदर दागिना
केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा टवटवीत होते.कोरड्या त्वचेसाठी केळ्याचा फेस पॅक खूप फायदेशीर आहे. केळ्यातील पोषक घटक त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.तेलकट त्वचा असलेल्यांसाठीही हे उपयुक्त आहे, कारण ते चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा कमी करते.
केळ्याचा फेस पॅक वापरल्याने त्वचा सैल पडत नाही आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हे वृद्धत्वाशी लढणारे म्हणूनही काम करते.केळ्याचा फेस पॅक वापरल्याने त्वचा सैल पडत नाही आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हे वृद्धत्वाशी लढणारे म्हणूनही काम करते. केळी त्वचेचा टोन सुधारण्यास आणि काळे डाग हलके करण्यास मदत करते.
