Lokmat Sakhi >Beauty > वय कितीही वाढलं तरी दिसा कायम तरुण, करा 'या' ५ गोष्टी-वय ओळखूच येणार नाही..

वय कितीही वाढलं तरी दिसा कायम तरुण, करा 'या' ५ गोष्टी-वय ओळखूच येणार नाही..

Anti-Ageing Tips : तरूण दिसण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करून महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स घेण्याची काहीच गरज नाही. कारण रोज काही गोष्टी फॉलो करून, आहारात बदल करूनही तुम्ही नेहमीसाठी तरूण दिसू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:39 IST2025-06-25T10:53:59+5:302025-06-25T17:39:39+5:30

Anti-Ageing Tips : तरूण दिसण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करून महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स घेण्याची काहीच गरज नाही. कारण रोज काही गोष्टी फॉलो करून, आहारात बदल करूनही तुम्ही नेहमीसाठी तरूण दिसू शकता.

Ayurvedic tells tips to stop premature aging and look young | वय कितीही वाढलं तरी दिसा कायम तरुण, करा 'या' ५ गोष्टी-वय ओळखूच येणार नाही..

वय कितीही वाढलं तरी दिसा कायम तरुण, करा 'या' ५ गोष्टी-वय ओळखूच येणार नाही..

Anti-Ageing Tips : चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्यात गडबड, केमिकलयुक्त उप्तादनांचा अधिक वापर यामुळे आजकाल बरेच लोक वेळेआधीच म्हातारे दिसू लागतात. अशात तरूण दिसण्यासाठी अ‍ॅंटी-एजिंग प्रॉडक्ट्सचा वापर करणं सुरू करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तरूण दिसण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करून महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स घेण्याची काहीच गरज नाही. कारण रोज काही गोष्टी फॉलो करून, आहारात बदल करूनही तुम्ही नेहमीसाठी तरूण दिसू शकता.

प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी अशा काही सवयींबाबत सांगितलं आहे ज्या फॉलो करून तुम्ही वय वाढल्यावरही तरूण दिसू शकता. 

तरूण दिसण्यासाठी काय करावे?

जर तुम्हाला तुमच्या वाढत्या वयाची लक्षणं स्लो करायची असतील तर डॉक्टरांनी सांगितलेल्या अ‍ॅंटी-एजिंग टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात. 

तूप खा

डॉक्टरांनुसार, जर तुमचं मेटाबॉलिज्म चांगलं असेल तर तुम्ही रोज एक चमचा तूप खाऊ शकता. तुपानं वाढत्या वयाची लक्षणं स्लो करण्यास मदत मिळू शकते.

फिजिकली रहा अ‍ॅंक्टिव

तरूण दिसण्यासाठी गरजेचं आहे की, सुस्त लाइफस्टाईल सोडून अ‍ॅक्टिव रहा. यासाठी वॉक करा. दिवसातून किमान १० हजार पावलं चालावे.

रात्रीचं जेवण लवकर करा

रात्री जेवण हे सूर्यास्ताच्या आधी केलेलं कधीही चांगलं. जर इतक्या लवकर शक्य नसेल तर सूर्यास्तानंतर १ तासाच्या आत तुम्ही जेवण केलं पाहिजे.

पुरेशी झोप

वाढत्या वयाची लक्षण स्लो करण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं ठरतं. रोज किमान सात ते आठ तासांची झोप घ्यावी.

सीजनल फळं-भाज्या खा

सीजनल फळं आणि भाज्या खाणं खूप फायदेशीर असतं. तसेच सोबतच नियमितपणे हलका व्यायाम करा. यानं तुम्हाला नेहमीच तरूण त्वचा मिळण्यास मदत मिळू शकेल.

Web Title: Ayurvedic tells tips to stop premature aging and look young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.