Sunscreen Using Tips : नाही म्हणता म्हणता थंडी आता जवळपास गायबच झालीये. थंडी कमी झाली की, उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. सकाळी सकाळी कडक ऊन पडतं आणि त्यामुळे घामाच्या धाराही लागतात. इतकंच नाही तर उन्हाच्या प्रखर किरणांमुळे त्वचा काळवंडते. अशात उन्हापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त महिला सनस्क्रीनचा वापर करतात. त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने त्वचा सैल होणे, ड्राय आणि डॅमेज होणे या समस्यांपासून बचाव होतो. पण बरेचजण सनस्क्रीन लावताना काही चुका करतात, ज्यामुळे त्याचे पुरेसे फायदे मिळत नाहीत. इतकंच नाही तर त्वचेचं नुकसान देखील होतं. सनस्क्रीन लावताना काय चुका टाळाव्या आणि काय काळजी घ्यावी हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं.
सनस्क्रीन लावण्याची योग्य वेळ
जास्तीत जास्त हेच बघायला मिळतं की, सनस्क्रीन लावलं की, लोक घरातून बाहेर पडतात. पण सनस्क्रीन लावण्याची ही पद्धत चुकीची आहे. कधीही बाहेर उन्हात जाण्याचा प्लॅन असेल तर बाहेर पडण्याच्या साधारण १० ते १५ मिनिट आधीच सनस्क्रीन लावा असं केल्याने सनस्क्रीनला त्वचेवर त्याचं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि नंतर याने तुमचा उन्हापासून चांगला बचावही होतो.
केवळ एकदा लावणे
दिवसातून एकदा म्हणजे घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लावलं आणि झालं, असा विचार करणंही चुकीचं आहे. सनस्क्रीन दोन ते तीन तासांनी पुन्हा लावायला हवं. हेही लक्षात ठेवा की, स्वीमिंग आणि ड्रायव्हिंग केल्यानंतर सनस्क्रीनचा त्वचेवर वापर आवर्जून करावा.
केवळ उन्हाळ्यात लावणे
बरेच लोक असा विचार करतात की, ऊन असलं किंवा उन्हाळा आला तेव्हाच सनस्क्रीन लावलं पाहिजे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, सनस्क्रीन आपण कोणत्याही वातावरणात लावू शकता. कोणत्याही वातावरणात याने त्वचेला सुरक्षा मिळते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कधीही आपण याचा वापर करू शकता.
डार्क त्वचेवर न वापरणं
डार्क त्वचा असणाऱ्या लोकांना वाटतं की. उन्हामुळे त्यांच्या त्वचेचं काही नुकसान होणार नाही. त्यामुळे ते सनस्क्रीनचा वापर करत नाहीत. उन्हामुळे कोणत्याही त्वचेचं नुकसान होतं. त्यामुळे कोणत्याही टाईपच्या त्वचेसाठी याचा वापर करता येतो.
एसपीएफची काळजी
सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात तो म्हणजे एसपीएफ. कधीही सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफवर लक्ष दिलं पाहिजे. कारण एसपीएफ सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हे एक रेटींग फॅक्टर आहे जे दुर्शवतं की, कोणतं सनस्क्रीन किंवा सनब्लॉक तुमचा कोणत्या स्तरापर्यंत बचाव करतं.
आधी काय लावाल?
नेहमीच त्वचेवर आधी सनस्क्रीन लावा, नंतर प्रायमर. सनस्क्रीन आपल्या स्किनकेअर रूटीनची शेवटची स्टेप आहे. जी आपल्या त्वचेवर एक सुरक्षात्मक थर तयार करतो. प्रायमर मेकअप रूटीनची पहिली स्टेप आहे. जो एक चिकट बेस तयार करतो, ज्यामुळे फाउंडेशन आणि इतर प्रॉडक्ट्स त्वचेवर चांगल्याप्रकारे चिकटून राहतात.
Web Summary : Protect your skin this summer by avoiding common sunscreen application mistakes. Apply 15 minutes before sun exposure, reapply every two to three hours, use year-round, regardless of skin tone, and choose the right SPF. Sunscreen should be applied before primer.
Web Summary : गर्मी में सनस्क्रीन लगाते समय कुछ गलतियों से बचें। धूप में निकलने से 15 मिनट पहले लगाएं, हर दो-तीन घंटे में दोबारा लगाएं, पूरे साल इस्तेमाल करें, त्वचा के रंग पर ध्यान न दें, और सही एसपीएफ़ चुनें। प्राइमर से पहले सनस्क्रीन लगाएं।