Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या ४ कॉमन चुका, ज्यामुळे गायब होतो चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो!

हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या ४ कॉमन चुका, ज्यामुळे गायब होतो चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो!

Winter skin care mistakes: योग्य ती काळजी घेतली तर त्वचा चमकदार, मुलायम आणि ग्लोइंग दिसते. अशात या दिवसात कोणत्या चुका केल्याने त्वचेचं नुकसान होतं हे जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:42 IST2024-12-19T11:41:25+5:302024-12-19T11:42:00+5:30

Winter skin care mistakes: योग्य ती काळजी घेतली तर त्वचा चमकदार, मुलायम आणि ग्लोइंग दिसते. अशात या दिवसात कोणत्या चुका केल्याने त्वचेचं नुकसान होतं हे जाणून घेऊ.

Avoid These Common Winter Skincare Mistakes For Healthy Skin | हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या ४ कॉमन चुका, ज्यामुळे गायब होतो चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो!

हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या ४ कॉमन चुका, ज्यामुळे गायब होतो चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो!

Winter skin care mistakes: हिवाळ्यात थंड हवा आणि कोरड्या वातावरणामुळे त्वचाही कोरडी होते. अशात चेहरा रखरखीत आणि निर्जीव दिसतो. या दिवसांमधील वातावरणामुळे त्वचा उलते, ताणली जाते आणि सुरकुत्याही येतात. अशा थंडीत त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवणं एक आव्हानच ठरतं. या दिवसांमध्ये केल्या गेलेल्या काही चुकांमुळेही त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या होतात. थंडीत त्वचेची भरपूर काळजी घ्यावी लागते. योग्य ती काळजी घेतली तर त्वचा चमकदार, मुलायम आणि ग्लोइंग दिसते. अशात या दिवसात कोणत्या चुका केल्याने त्वचेचं नुकसान होतं हे जाणून घेऊ.

पाणी कमी पिणे

हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते. ज्यामुळे लोक दिवसभर पुरेसं पाणी पित नाहीत. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं आणि त्वचे निर्जीव, रखरखीत दिसू लागते. पाण्याने त्वचा केवळ मॉइश्चराईज होते असं नाही तर टॉक्सिन्स बाहेर काढून त्वचा निरोगी राहते. त्यामुळे हिवाळ्यात रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे.

सूर्यकिरण टाळणे

हिवाळ्यात उन्हामुळे गरम वाटतं. पण अनेक लोक उन्ह टाळण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होते. व्हिटॅमिन डी हे केस आणि त्वचेसाठी महत्वाचं असतं. त्यामुळे रोज १० ते १५ मिनिटे उन्ह घ्यावं. याने त्वचेला नॅचरल चमक मिळते आणि त्वचेचं आरोग्यही चांगलं राहतं.

मॉइश्चरायजरचा वापर न करणं

थंड हवेमुळे त्वचा रखरखीत होते आणि ताणल्या जाते. मॉइश्चरायजर न लावल्याने त्वचेचा ओलावा नष्ट होतो. ज्यामुळे त्वचा उलते आणि निर्जीव दिसते. अशात थंडीत त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी नियमितपणे मॉइश्चरायजरचा वापर करावा, खासकरून आंघोळ केल्यावर आणि हात धुतल्यावर.

जास्त गरम पाण्याने आंघोळ

थंडीत जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेमधील नॅचरल ऑइल नष्ट होतं. ज्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते. त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करा आणि त्वचेवर मॉइश्चरायजर लावा. 

Web Title: Avoid These Common Winter Skincare Mistakes For Healthy Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.