lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Darkness of underarms: अंडरआर्म्सचा काळपटपणा वाढतो कारण 3 चुका; करा २ घरगुती उपाय

Darkness of underarms: अंडरआर्म्सचा काळपटपणा वाढतो कारण 3 चुका; करा २ घरगुती उपाय

Beauty tips: चारचौघांमध्ये हात वर करायचीही लाज वाटावी, एवढी काख काळी पडली असेल तर तुम्ही नक्कीच या काही चुका करत आहात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 05:42 PM2022-03-01T17:42:35+5:302022-03-01T17:43:39+5:30

Beauty tips: चारचौघांमध्ये हात वर करायचीही लाज वाटावी, एवढी काख काळी पडली असेल तर तुम्ही नक्कीच या काही चुका करत आहात..

Avoid these 3 mistakes that makes your underarms more and more dark...2 home remedies to clean dark underarms | Darkness of underarms: अंडरआर्म्सचा काळपटपणा वाढतो कारण 3 चुका; करा २ घरगुती उपाय

Darkness of underarms: अंडरआर्म्सचा काळपटपणा वाढतो कारण 3 चुका; करा २ घरगुती उपाय

Highlightsतेथील डेड स्किन काढून टाकण्यासाठी डिप क्लिंजिंग होणे गरजेचे आहे.

काळी पडलेली काख ही अनेक जणींसाठी डोकेदुखी असते. अशा मैत्रिणींना स्लिव्हलेस घालण्याची अजिबात सोय नसते.. खास करून उन्हाळ्यात तर या गोष्टींचा खूप त्रास होतो आणि काखेतला काळेपणा (dark underarms) वाढत जातो. काळ्या पडलेल्या काखेमुळे चारचौघात स्लिव्हलेस घालण्याचीही लाज वाटावी, अशी तुमची अवस्था झाली असेल तर नक्कीच तुमच्या कडून या ३ चुका होत आहेत. या चुका करणं टाळलं तर नक्कीच काखेचा काळेपणा कमी होऊ शकतो.

 

१. खूप डिओ मारण्याची सवय
काही जणांना आंघोळ करून बाहेर आल्या आल्या किंवा बाथरूममध्येच अंगावर खूप डिओ मारून घेण्याची सवय असते. आंघोळ केल्यावर अंगात उष्णता निर्माण होते. त्वचा थोडी नाजूक झालेली असते. अशावेळी जर डिओमध्ये असणाऱ्या केमिकल्सचा त्वचेवर सातत्याने मारा होत राहिला, तर काखेतला भाग हळूहळू अधिकाधिक काळा पडत जातो. यामुळे अंग पुर्ण कोरडं झाल्यावरच डिओ मारा. तसंच डिओ मारताना ठराविक अंतर राखून डिओ मारा. तो शरीराच्या खूप जवळ असू नये. (home remedies for dark underarms)

 

२. हेअर रिमुव्हल क्रिम
काखेतले केस काढून टाकण्यासाठी अनेक जण हेअर रिमुव्हल क्रिमचा वापर करतात. हा वापर खूप जास्त प्रमाणात करत असाल तरी त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. यामध्ये असणारे केमिकल्स त्वचेचा मुळ रंग बिघडवतात. त्यामुळे हेअर रिमुव्हल क्रिमचा वापर मर्यादित ठेवा. महिन्यातून एकदाच हे क्रिम वापरा. हेअर रिमुव्हल क्रिम ऐवजी इलेक्ट्रिक रेझरचा वापर करणे अधिक फायदेशीर. 

 

३. खूप घट्ट कपडे घालणे
महिलांमध्ये अतिघट्ट कपडे घालण्याची प्रचंड क्रेझ आहे. याचा वाईट परिणाम काखेवर होतो. कपडे खूप घट्ट असतील तर ते काखेत वारंवार काचतात. तेथील त्वचा नाजूक असल्याने ती वारंवार घासली जाते. त्यामुळे खाज येते. वारंवार खाजवणे आणि तंग कपडे तिथे वारंवार घासले जाणे, यामुळे सतत तिथे छोट्या छोट्या जखमा होतात आणि काख जास्त काळवंडते.

 

काळवंडलेली काख स्वच्छ करण्यासाठी सोपे उपाय
१. कच्चा बटाटा किसून घ्या. बटाट्याचा किस एका वाटीत घ्या. त्यामध्ये किस भिजेल एवढेच पाणी टाका. १० ते १५ मिनिटांनी या वाटीच्या तळाला पांढरा चिकट पदार्थ म्हणजेच बटाट्याचं स्टार्च जमा झालं असेल ते वेगळं काढून घ्या. त्यामध्ये अर्धे लिंबू पिळा. हा लेप काखेत लावा. १० ते १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम होतो. 

२. तेथील डेड स्किन काढून टाकण्यासाठी डिप क्लिंजिंग होणे गरजेचे आहे. यासाठी एक चमचा हरबरा डाळीचं पीठ, १ चमचा दही आणि त्यात चुटकीभर हळद टाका. हा लेप काखेत लावा आणि चोळून चाेळून मसाज करा. १० ते १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. यामुळेही काळी काख स्वच्छ होण्यास मदत होईल. 
 

Web Title: Avoid these 3 mistakes that makes your underarms more and more dark...2 home remedies to clean dark underarms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.