आजकालच्या काळात केसांच्या वाढत्या अनेक समस्यांनी अनेकजणी हैराण आहेत. केस विंचरताना कंगव्यात अडकलेले केस पाहून गळत्या केसांवर नेमका काय उपाय करावा, जेणेकरुन केसगळती थांबेल असा प्रश्न पडतो. कमी वयातच केस गळणे, पातळ होणे, कोरडे-निस्तेज दिसणे अशा समस्या आता खूप कॉमन झाल्या आहेत. केसगळती थांबवून, केसांची वाढ भराभर होण्यासाठी नैसर्गिक उपायांची सर कशालाच येत नाही. आयुर्वेदात अश्वगंधाला 'वनस्पतींचा राजा' मानले जाते. अश्वगंधा केसांचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवू शकते. अश्वगंधाचा लेप केसांच्या मुळांना नवसंजीवनी देण्याचे काम करतो(ashwagandha for hair growth).
'अश्वगंधा' ही आयुर्वेदातील एक फायदेशीर औषधी वनस्पती असून ती ताण कमी करण्यासोबतच केसांच्या मुळांना बळकटी देते आणि स्काल्पला पोषण पुरवते. केसांसाठी अश्वगंधा लेप किंवा हेअर मास्क नियमित वापरल्यास केसगळती कमी होणे, केस मजबूत व दाट होणे आणि केसांना नैसर्गिक चमक मिळणे असे अनेक फायदे दिसून येतात.अश्वगंधा पावडरचा लेप (ashwagandha hair mask how to use) थेट केसांच्या मुळांना लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळून केसगळती थांबते. घरच्याघरी सहज तयार करता येणारा हा उपाय केसांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. केसांचा पोत सुधारण्यासाठी (ashwagandha hair growth remedy) आणि त्यांना मुळापासून मजबूत करण्यासाठी अश्वगंधा पावडरचा लेप कसा करायचा पाहूयात.
केसांसाठी अश्वगंधाचा लेप कसा तयार करायचा ?
केसांसाठी अश्वगंधाचा लेप तयार करण्यासाठी आपल्याला २ ते ३ टेबलस्पून अश्वगंधाची पावडर, २ टेबलस्पून दही, १ टेबलस्पून मध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
केसांच्या मजबुतीसाठी आणि वाढीसाठी अश्वगंधाचा हा लेप घरच्या घरी बनवणे अतिशय सोपे आहे. सर्वात आधी अश्वगंधाची पाने नीट वाळवून घ्या आणि त्यानंतर मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर तयार करा. तयार केलेली ही पावडर एका स्वच्छ वाटीमध्ये काढून घ्या. आता या पावडरमध्ये थोडे मध मिक्स करा. मध केसांच्या नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यानंतर यामध्ये थोडे ताजे दही घाला आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून एक घट्टसर पेस्ट (लेप) तयार करा.
'नो पेंडेंट' मंगळसुत्रांचे १० युनिक डिझाईन्स! कमी सोन्यातही जास्त भारी - सिंपल युटीफुल नवा ट्रेंड...
हे मिश्रण चमच्याने नीट हलवून एकजीव करून घ्या जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. तयार झालेली ही पेस्ट ब्रशच्या मदतीने केसांच्या मुळांना आणि केसांना नीट लावा. हा लेप लावल्यानंतर साधारण ३० ते ४० मिनिटे केसांवर तसाच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने किंवा सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा. उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून एकदा हा उपाय नक्की करून पहा.
हा उपाय कसा फायदेशीर...
१. अश्वगंधा शरीरातील 'कोर्टिसोल' पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे तणावामुळे होणारी केसगळती थांबते.
२. या लेपामुळे स्कल्प रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळून केस मजबूत होतात.
३. मिश्रणातील मध केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतो, ज्यामुळे कोरडे आणि निर्जीव केस मऊ व चमकदार होतात.
४. दही आणि अश्वगंधाच्या एकत्रित वापरामुळे स्काल्पवरील खाज कमी होते आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
५. अश्वगंधा केसांमधील 'मेलेनिन'चे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते.
६. या मास्कमधील पोषक तत्त्वांमुळे केसांची लांबी वाढण्यास आणि केस दाट होण्यास मदत होते.
