अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की सतत केस कापल्यामुळे केस गळतात का? काहींना वाटते की वारंवार ट्रिमिंगमुळे केस खराब होतात, पण प्रत्यक्षात हे पूर्णपणे खरं नाही. केस केसाला कात्री लागल्यावर लगेच ते कमकुवत होतातच असे नाही. (Are parlor treatments really beneficial or harmful? should we cut hair multiple times? )केस कापल्याने केस गळत नाहीत, तर केस वारंवार कापल्याने गळतात. ठराविक कालावधी नंतर केस टोकाकडे कापणे उलट टोकांवरील तुटक केस दूर करते आणि केस अधिक निरोगी दिसतात. मात्र, जर केसांवर सतत केमिकलयुक्त उपचार, रंग किंवा हीट स्टायलिंग केली जात असेल, तर ते गळायला लागतात. म्हणजेच केस कापणे हे कारण नसून, केसांवर येणारा अति ताण आणि रासायनिक प्रक्रिया ही खरी समस्या आहे.
केसांची ताकद त्यांच्या मुळांवर अवलंबून असते. त्यामुळे केस गळती कमी करण्यासाठी मुळांपासून पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. नियमित तेल लावणे, मसाज करणे, योग्य शाम्पू वापरणे आणि आहारात प्रोटीन आणि जीवनसत्त्व असलेले पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे. तीळ, नारळ किंवा बदाम तेल कोमट करुन टाळूवर लावल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि मुळे मजबूत होतात.
सततच्या पार्लर ट्रीटमेंट्सचा केसांवर परिणाम मात्र नक्कीच होतो. रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग, स्मूदनिंग किंवा केमिकल स्पा यांसारख्या प्रक्रिया केसांतील नैसर्गिक तेल काढून टाकतात. त्यामुळे केस कोरडे, निस्तेज आणि तुटक होतात. काही वेळा टाळूही कोरडा पडतो आणि कोंड्याचा त्रास वाढतो. अशा ट्रीटमेंट्समुळे केसांची लवचिकता कमी होते आणि ते सहज तुटतात. तसेच केसांना वारंवार रंग लावल्यानेही नुकसान होते. बहुतेक हेअर कलर्समध्ये अमोनिया आणि इतर रासायनिक घटक असतात, जे केसांच्या बाहेरील आवरणाला कमकुवत करतात. त्यामुळे केसांची नैसर्गिक चमक कमी होते, मुळे कोरडी पडतात आणि केस गळती वाढते.
त्यामुळे हेअरकट करणे केसांच्या वाढीवर परणाम करत नाही, मात्र केसांना सारखी कात्री लागली की त्यांचे गळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सतत जर पार्लर ट्रिटमेंट्स घेत असाल तर त्याचा प्रमाण कमी करा.
