How to use coconut oil for young skin : वाढत्या वयात शरीरासोबतच त्वचेलाही अधिक पोषणाची गरज असते. वयानुसार त्वचेतील नॅचरल मॉइश्चर कमी होऊ लागतं आणि त्वचा अधिक ड्राय होते. अशात त्वचेवर सुरकुत्या, फाइन लाइन्स आणि डार्क स्पॉट्ससारख्या समस्या होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं हे वय वाढण्याचं एक लक्षण आहे.
वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी आणि नेहमी तरूण दिसण्यासाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलाने चेहऱ्याची मसाज करू शकता. खोबऱ्याच्या तेलाने त्वचा टाइट होते आणि सुरकुत्याही कमी होतात. सोबतच यात आढळणारे नॅचरल तत्व अॅंटी-एजिंग इफेक्ट्स देतात.
कसा कराल खोबऱ्याच्या तेलाचा वापर?
खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर लावून काही वेळासाठी तसंच ठेवलं तर याने त्वचेला आतपर्यंत पोषण मिळतं आणि त्वचा मुलायम होते. मात्र, तुमची त्वचा कशी आहे त्यानुसार तेलाचा वापर करावा. जर त्वचा ऑयली असेल तर खोबऱ्याचं तेल लावू नका.
हळद आणि खोबऱ्याचं तेल
निरोगी आणि तरूण त्वचेसाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलात थोडी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. हळदीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल गुण आढळतात. हे सगळे तत्व त्वचेला आतून निरोगी आणि बाहेरून तरूण बनवतात. रात्री चेहऱ्यावर हळद आणि खोबऱ्याच्या तेलाचा हा फेसपॅक लावू शकता.
कसा कराल वापर?
१ चमचा खोबऱ्याच्या तेलात चिमूटभर हळद पावडर मिक्स करा. याची स्मूद पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर ही पेस्ट लावण्याआधी चेहरा चांगला धुवून घ्या. २० ते २५ मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवावा.
चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल आणि हळद लावण्याचे फायदे
या फेसपॅकने त्वचेवर जमा झालेला मळ-धूळ साफ होण्यास मदत मिळते. तसेच या मिश्रणाने त्वचेवरील एक्ने आणि पिंपल्सही दूर होतात. स्कीन टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी हळद आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण फायदेशीर ठरतं. तसेच या उपायाने चेहरा तरूण आणि उजळलेला दिसेल.