उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर टॅनिंग येतं आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. सनस्क्रीन लावूनही चेहऱ्यावर हवा तसा ग्लो दिसत नाही. चेहरा चमकवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. तुम्ही दिवसा चेहऱ्याला काय लावता, या प्रमाणेच रात्री चेहऱ्याला काय लावता हे सुद्धा महत्वाचे असते. तुम्हाला ग्लोईंग, तजेलदार त्वचा हवी असेल तर तुम्ही नारळाच्या तेलासोबत १ खास पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकेल आणि सुंदर दिसेल. (Apply Coffee Powder Mixed With Coconut Oil Before Sleeping At Night Get A Natural Glow)
नारळाचं तेल त्वचेससाठी कसं फायदेशीर
आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, प्रदूषण यामुळे त्वचेवर चुकीचा परिणाम होतो. ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. नारळाचं तेल तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू सकते. ज्यामुळे कोरड्या त्वचेला आतून पोषण मिळते. रात्री हे तेल लावून झोपल्यानं त्वचा मऊ, मुलायम आणि ग्लोईंग दिसून येते.
नारळाचं तेल आणि कॉफी पावडर
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो हवा असेल तर तुम्ही रात्री झोपण्याआधी नारळाच्या तेलात थोडी कॉफी पावडर मिसळून चेहऱ्याला लावू शकता. एका वाटीत दोन्ही पदार्थ एकजीव करून पेस्ट तयार करून घ्या. त्वचेवर १० मिनिटांसाठी तसंच लावून ठेवा नंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसून येईल.
जर तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स असतील तर तुम्ही या नारळाच्या तेलात कॉफी पावडर घालून पेस्ट तयार करून शकता. ही पेस्ट डार्क सर्कल्सवर लावा. ज्यामुळे चेहऱ्याची घाण निघण्यास मदत होईल आणि चेहरा नेहमी चांगला दिसेल. पिंपल्सवरही तुम्ही मिश्रण लावू शकता. ज्यामुळे पिंपल्स हळूहळू कमी होतील आणि चेहऱ्यावर आतून ग्लो येईल. हा फेस पॅक लावल्यानं डेड स्किन सेल्स निघून जाण्यासही मदत होईल.
त्वचा हायड्रेट राहील
कॉफी पावडरमध्ये नारळाचं तेल घालून ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानं कोरडी त्वचा रिपेअर होण्यासोबतच हायड्रेटही राहील. रात्री झोपण्याच्या आधी हा उपाय केल्यास सकाळी चेहरा क्लिअर दिसून येईल.
Web Summary : Combat dull skin with coconut oil and coffee. This mix hydrates, removes dead cells, reduces dark circles and pimples. Apply nightly for a natural glow.
Web Summary : नारियल तेल और कॉफी से त्वचा की चमक बढ़ाएं। यह मिश्रण हाइड्रेट करता है, मृत कोशिकाओं को हटाता है, काले घेरे और पिंपल्स को कम करता है। प्राकृतिक चमक के लिए रात में लगाएं।