हळद आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळते. हळद घरात असूनही फार वापरली जात नाही. मात्र हळद त्वचेसाठी फार औषधी आहे. त्वचेच्या विविध समस्यांसाठी आपण विविध प्रयोग करत असतो. मात्र उपाय बरेचदा घरातच असतो. ( apply 4 packs of turmeric on your face, traditional remedy - your face will have a golden glow)तसेच हळद त्वचेसाठी वापरणे फार फायद्याचे ठरते. आयुर्वेदात हळदीला सौंदर्यवर्धक गुणधर्मासाठी विशेष स्थान दिले गेले आहे. त्वचा उजळवणे, पिंपल्स कमी करणे, डाग घालवणे किंवा त्वचेला मऊसर ठेवणे यासाठी हळदीचे विविध फेस पॅक उपयुक्त ठरतात. हळदीमध्ये काय मिसळल्यावर कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
१. सर्वात सोपा उपाय म्हणजे हळद आणि दुधाचा फेस पॅक. हळद आणि कच्चं दूध एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील मळ निघून जातो. त्वचा स्वच्छ होते. तसेच चेहरा छान उजळतो. तसेच त्वचा सारखी कोरडी पडत असेल तर कोरडेपणा दूर होतो आणि त्वचा छान राहते.
२. दुसरा उत्तम फेस पॅक म्हणजे हळद आणि बेसनाचा. हळदीसोबत बेसन आणि थोडं गुलाबपाणी मिसळून लावल्यास त्वचेसाठी फारच फायद्याचे ठरते. त्वचेचा तेलकटपणा कमी होतो, पिंपल्सचा त्रास कमी होतो आणि चेहरा छान मऊ होतो.
३. तिसरा पर्याय म्हणजे हळद आणि दही असा थंड फेसपॅक. दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर ठेवते. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी मदत करते. आणि हळदीमुळे त्वचेवरील डाग, काळेपणा कमी होतो. नियमित वापरल्यास चेहऱ्याचा ग्लो वाढतो.
४. चौथा उपाय म्हणजे हळद आणि मध असा फेसपॅक. मध त्वचेला पोषण देते. कोरडेपणा घालवते आणि हळद अँण्टी बॅक्टेरियल असल्यामुळे संसर्गजन्य समस्या कमी करते. प्रदूषणामुळे जर त्वचेला काही नुकसान होत असेल तर ते होण्यापासून टाळता येते. निस्तेज त्वचा पुन्हा तजेलदार करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
या सर्व पॅक्सचा उपयोग आठवड्यातून दोनदा केल्यास त्वचेत नैसर्गिक चमक निर्माण होते आणि बाजारातल्या रसायनयुक्त क्रीमशिवायही चेहऱ्याचं सौंदर्य टिकवता येतं. हळदीचे हे फेसपॅक नक्की वापरुन पाहा.