Lokmat Sakhi >Beauty > वाढत्या वयातही तरूण दिसायचंय, सैल त्वचा टाइट करायचीये? लगेच ट्राय 'हा' खास फेसपॅक

वाढत्या वयातही तरूण दिसायचंय, सैल त्वचा टाइट करायचीये? लगेच ट्राय 'हा' खास फेसपॅक

Anti-Ageing Facepack : आपल्याला सुद्धा वाढत्या वयातही त्वचा तरूण ठेवायची असेल तर काही फेसपॅक यात आपली मदत करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:03 IST2025-08-05T11:03:13+5:302025-08-05T11:03:57+5:30

Anti-Ageing Facepack : आपल्याला सुद्धा वाढत्या वयातही त्वचा तरूण ठेवायची असेल तर काही फेसपॅक यात आपली मदत करू शकतात.

Anti aging face pack for tight young skin | वाढत्या वयातही तरूण दिसायचंय, सैल त्वचा टाइट करायचीये? लगेच ट्राय 'हा' खास फेसपॅक

वाढत्या वयातही तरूण दिसायचंय, सैल त्वचा टाइट करायचीये? लगेच ट्राय 'हा' खास फेसपॅक

Anti-Ageing Facepack : त्वचेवर दिसणारी म्हातारपणाची लक्षणं चेहऱ्याचं सौंदर्य कमी करण्याचं काम करतात. प्रत्येकाला वाटत असतं की, त्यांची त्वचा नेहमीच तरूण आणि फ्रेश दिसावी. पण आपल्याचा काही चुकांमुळे हे शक्य होत नाही. आपल्याला सुद्धा वाढत्या वयातही त्वचा तरूण ठेवायची असेल तर काही फेसपॅक यात आपली मदत करू शकतात. आज अशाच एका अ‍ॅंटी-एजिंग म्हणजे त्वचेचं वय कमी करणाऱ्या फेसपॅकबाबत आपण बघणार आहोत. 

कशापासून बनवला फेसपॅक?

बाहेर पार्लरमध्ये पैसे खर्च न करता घरीच अ‍ॅंटी-एजिंग फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला अ‍ॅवोकाडो आणि आणि ओट्सच गरज भासेल. आधी अ‍ॅवोकाडो बारीक करा, त्यानंतर ओट्सही बारीक करा. एका वाटीमध्ये दोन्ही गोष्टी टाकून चांगल्या मिक्स करा. तयार झालेली पेस्ट फेसपॅकसारखी चेहऱ्यावर लावा.

हा फेसपॅक पूर्ण चेहऱ्यावर चांगल्या पद्धतीनं लावा. १५ ते २० मिनिटं हा फेसपॅक असाच चेहऱ्यावर लावून ठेवा. २० मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवा. आठवड्यातून एक ते दोन वेळा हा फेसपॅक वापरू शकता. महत्वाची बाब म्हणजे हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.

कसा मिळतो फायदा?

अ‍ॅवोकाडोमधील व्हिटामिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं. तर ओट्समधील तत्वांनी त्वचा टाइट होते आणि तरूण दिसते. तसेच या फेसपॅकमधील तत्वांनी कोलेजनचं उत्पादन भरपूर वाढतं. अ‍ॅवोकाडो आणि ओट्सच्या या फेसपॅकनं त्वचा तरूण तर दिसतेच, सोबतच त्वचेचं रंगही खुलतो.

Web Title: Anti aging face pack for tight young skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.