Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेचं 'झिरो बजेट' स्किनकेअर रुटीन - सुरकुत्या, लूज पडलेली त्वचा होईल टाईट - वय चेहऱ्यावर दिसणारचं नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 20:05 IST

Ankita Lokhande Ice Cube Beauty Secret For Tighten & Glowing Skin : Ankita Lokhande beauty secret : skin tightening & glowing skin home remedy : वयानुसार लूज पडलेली त्वचा टाईट आणि ग्लो करण्यासाठी अंकिता लोखंडेचा खास घरगुती उपाय...

वाढत्या वयानुसार त्वचेतील लवचिकता कमी होणे आणि त्वचा लटकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण योग्य काळजी घेतल्यास आपण हा त्वचेतील बदल नक्कीच लांबणीवर टाकू शकतो. वाढत्या वयानुसार चेहऱ्याची त्वचा सैल होणं, लटकलेली दिसणं आणि नैसर्गिक चमक कमी होणं ही अनेकजणींची कॉमन समस्या आहे, यामुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू लागतो. वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये असं प्रत्येकीलाच वाटतं असतं पण नेमकं यावर उपाय काय करायचा हे कित्येकींना माहित नसते. वयानुसार लूज होणाऱ्या त्वचेला पुन्हा टवटवीत करण्यासाठी टीव्ही आणि बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे एका घरगुती उपायाला पसंती देते. चेहऱ्याची लटकणारी त्वचा पुन्हा टाइट करण्यासाठी आणि चेहऱ्यावर टवटवीतपणा आणण्यासाठी अंकिता 'आईस क्यूब्स'चा  वापर करते. हा उपाय त्वचेला टाईट करण्यासोबतच त्वचेला ताजेतवाने आणि फ्रेश लूक देण्यास मदत करतो(Ankita Lokhande Ice Cube Beauty Secret For Tighten & Glowing Skin).

अंकिताच्या डेली ब्यूटी रुटीनमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 'आईस फेशियल'. चेहऱ्याच्या त्वचेचा सैलपणा दूर करण्यासाठी आणि त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेटेड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर हा अंकिताचा सर्वात आवडता उपाय आहे. लूज झालेल्या त्वचेला 'इन्स्टंट लिफ्ट' देणारा हा घरगुती नॅचरल उपाय  आजच्या धावपळीच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये (Ankita Lokhande beauty secret) प्रत्येकीसाठी फायदेशीर ठरू शकतो. वयानुसार लूज  पडलेली त्वचा टाईट आणि ग्लो (skin tightening & glowing skin home remedy) करण्यासाठी खास घरगुती उपाय... 

जादुई आईस क्यूब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. अळशी पावडर - १ टेबलस्पून २. मुलेठी पावडर - १ टेबलस्पून ३. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल - २ ते ३ कॅप्सूल४. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून ५. राईस वॉटर - १ कप 

फ्रंट हूक ब्लाऊजचे १० नेक डिझाइन्स-‘इतके’ सुंदर ब्लाऊज डिझाइन्स तुम्ही आजवर पाहिले नसतील...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये अळशी पावडर, मुलेठी पावडर एकत्रित घेऊन मिसळून घ्याव्यात. २. आता या पावडरच्या मिश्रणात व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल फोडून घालाव्यात. ३. सगळ्यात शेवटी या मिश्रणात एलोवेरा जेल आणि राईस वॉटर घालून मिश्रण थोडं पातळ करून घ्यावं. ४. आता हे तयार मिश्रण एका बर्फाच्या ट्रे मध्ये चमच्याने भरुन सेट होण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवून द्यावे. 

याचा वापर कसा करावा ? 

दररोज सकाळी उठल्यावर यातील एक बर्फाचा क्यूब घेऊन तो आपल्या त्वचेवर फिरवून हलकेच मसाज करावा. मग पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 

विकतचा महागडा पील ऑफ मास्क विसरा, ‘असा’ नॅचरल मास्क घरी करा- चेहऱ्यावरचा ग्लो पाहातच राहाल...

लूज झालेल्या त्वचेसाठी 'हे' आईस क्यूब वापरण्याचे फायदे... 

१. अळशी पावडर :- अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेला आतून पोषण देतात आणि नैसर्गिकरित्या त्वचा टाईट करण्यास मदत करतात. अळशीमुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.

२. मुलेठी पावडर :- मुलेठीमध्ये त्वचेचा रंग उजळण्याचे गुणधर्म असतात. हे चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन आणि टॅनिंग दूर करून त्वचेला नैसर्गिक चमक देते.

३. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल :- व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करते आणि त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते. यामुळे वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर लवकर जाणवत नाही.

४. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेलमध्ये हायड्रेटिंग गुणधर्म असतात. हे त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवते. आईस क्यूबमध्ये एलोवेरा जेल वापरल्यामुळे चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहतो आणि चेहरा दिवसभर फ्रेश दिसतो.

५. राईस वॉटर :- तांदळाच्या पाण्यात अमिनो ॲसिड्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे उत्तम 'स्किन टोनर' म्हणून काम करतात. हे त्वचेची छिद्रे लहान करण्यास मदत करते आणि लटकलेल्या त्वचेला 'इन्स्टंट लिफ्ट' देऊन चेहऱ्याला एक विशिष्ट आकार देते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ankita Lokhande's zero-budget skincare routine for youthful, tight skin.

Web Summary : Actress Ankita Lokhande uses ice cubes for skin tightening and a fresh look. Her routine includes homemade ice cubes with flaxseed powder, mulethi powder, vitamin E capsules, aloe vera gel, and rice water. This helps tighten loose skin and provides a radiant glow.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीअंकिता लोखंडेहोम रेमेडी