Join us

जवस म्हणजे जादू, केस - चेहरा आणि त्वचेसाठी ऑल इन वन उपाय! पाहा जवस कसे वापरायचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2025 08:55 IST

an all-in-one solution for hair - face and skin! See how to use flaxseed : जवस आहे प्रचंड औषधी. केसांसाठीही तसेच त्वचेसाठीही. पाहा कसे वापराल. अगदीच सोपा उपाय.

आपण बऱ्याच वेगवेगळ्या समस्यांसाठी विविध उपाय करत असतो. खास करून विदेशी पद्धतींचा वापर करून आपण आपले स्वास्थ असेल किंवा मग सौंदर्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. (an all-in-one solution for hair - face and skin! See how to use flaxseed )पण खरं तर आपल्या भारतात वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक पदार्थांमध्ये शरीराला गरजेचे असलेले सगळे घटक असतात. पण आपल्याला त्या पदार्थाचे महत्व माहिती नसते. असाच एक पदार्थ म्हणजे जवस. आपण जवसाची चटणी तयार करतो. इतरही काही पदार्थांमध्ये जवस वापरतो. पण जवस हा आपल्या त्वचेसाठी तसेच केसांसाठी फार फायदेशीर आहे. ही गोष्ट अनेकांना माहितीच नाही. (an all-in-one solution for hair - face and skin! See how to use flaxseed )हेल्थलाईन तसेच थेल्थडॉटकॉम सारख्या साईट्सवर जवसाची माहिती उपलब्ध आहे.

जवस केसांसाठी फारच फायदेशीर आहे. केसांचे आरोग्य प्रदूषणामुळे तसेच खाण्याच्या सवयींमुळे खराब होते. ते सुधारण्यासाठी जवस हा रामबाण उपाय आहे. (an all-in-one solution for hair - face and skin! See how to use flaxseed )केसांसाठी जवसाचे पाणी तयार करायचे. ते फारच चिकट होते. जसे आपण कंडीशनर लावतो त्याप्रमाणे हे जवसाचे पाणी लावायचे. केसांना अनेक फायदे मिळतात. 

१. जवस केसांची मजबुती वाढवते. केस जर सारखे तुटत असतील तर केसांचे तुटणे थांबवते. 

२. केसांमधील कोंडाही कमी करते. बरेचदा केसांमध्ये ओला कोंडा तयार होतो. तो जाता जात नाही. असा चिवट कोंडाही जवसामुळे कमी होतो.

३. केस गळण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. तर ते प्रमाणही अगदी कमी करते. मात्र नित्य नियमाने जवसाचा वापर केला पाहिजे.

त्वचेसाठीही जवस अत्यंत फायदेशीर आहे. जवसामध्ये ओमेगा-३ असते. त्यामुळे चेहर्‍याचा तेलकटपणा कमी होतो. जवसाचा फेसपॅक तयार करायचा. जवस पाण्यात भिजत घालून नंतर ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. आणि तो पॅक चेहर्‍याला लावायचा.  

१. त्वचेला गरजेचा असलेला ओलावा जवसामुळे मिळतो. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. 

२. त्वचेची जळजळ कमी होते. तेलकटपणा नाहीसा होतो. जर काही डाग असतील तर ते ही जातात. त्वचा एकदम मुलायम होते.

३. जवस टॅन रिमुव्हर म्हणून उत्तम काम करते. उन्हामुळे काळवंडलेला चेहरा मस्त गोरापान होतो.  

टॅग्स :होम रेमेडीघरगुती उपायहेल्थ टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी