Skin Care: त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. काही लोक महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात, तर काही लोक नॅचरल पद्धतीनं त्वचेची काळजी घेतात. अनेक असे नॅचरल उपाय आहेत, ज्यांच्या मदतीनं त्वचा आतून निरोगी राहील आणि वरून चमकदार होईल. एक असं फळ ज्याच्या मदतीनं तुम्ही त्वचा चमकदार अन् निरोगी ठेवू शकता. हे फळ म्हणजे आवळा. आवळ्याचा ज्यूस पिऊन त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होऊ शकतात. अशात ज्यूसचे त्वचेला काय काय फायदे होतात ते जाणून घेऊ.
एजिंग साइन कमी होतात
आवळ्याच्या ज्यूसनं एजिंग साइन म्हणजे म्हातारपणाची त्वचेवर दिसणारी लक्षण कमी करण्यास मदत मिळते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि या व्हिटॅमिनच्या माध्यमातून त्वचा उजळते आणि फ्रेश दिसते. आवळ्याचा ज्यूस नियमितपणे प्याल तर त्वचेवरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्स दूर होतात.
डाग होतील दूर
चेहऱ्यावर दिसणारे डाग दूर करण्यासाठीही आवळ्याचा ज्यूस फायदेशीर ठरतो. आवळ्याचा ज्यूस प्यायल्यानं एक्नेही कमी होतात. हवं तर आवळ्याच्या ज्यूसमध्ये थोडा कोरफडीचा जेलही मिक्स करू शकता. यानं पिंपल्स आणि डार्क स्पॉट दोन्हीही कमी होऊ लागतात.
पिग्मेंटेशन दूर होतं
त्वचेवरील पिग्मेंटेशन कमी करण्यासही आवळ्याचा ज्यूस फायदेशीर ठरतो. या ज्यूसनं त्वचा टाइट होते. याचा ज्यूस पिण्यासोबतच आवळ्याचा रस तुम्ही चेहऱ्यावरही लावू शकता.
त्वचा क्लीन होते
आवळ्याच्या ज्यूस नॅचरल क्लींजरसारखं काम करतो. अशात हा ज्यूस पिऊन त्वचा आतून क्लीन होते. त्वचेवर जमा झालेली डेड स्कीनही निघून जाते. ज्यामुळे त्वचा उजळ आणि फ्रेश दिसते.