Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात घाला थोडं मीठ, फायदे वाचाल तर रोज कराल 'हा' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:42 IST

Salt Water Bath Benefits In Winter : थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यावर काय फायदे मिळतात हे फार कमी लोकांना माहीत असेल. आज आपण आंघोळीच्या कोमट पाण्यात मीठ टाकल्याने काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

Salt Water Bath Benefits In Winter : सध्या सगळीकडे थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. थंडी वाढली की, काही लोक आंघोळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडतात तर काही लोक थंडीमुळे आंघोळीची टाळाटाळ करतात. या दिवसात सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या होणे. काही लोकांची त्वचा या दिवसात कोरडी होते. काहींच्या त्वचेला भेगाही पडतात. त्यामुळे अनेकजण आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल किंवा दुधाचा वापर करतात. पण थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यावर काय फायदे मिळतात हे फार कमी लोकांना माहीत असेल. आज आपण आंघोळीच्या कोमट पाण्यात मीठ टाकल्याने काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

त्वचेची स्वच्छता

मिठामध्ये मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे मिनरल्स त्वचेच्या रोमछिद्रांपर्यंत जातात आणि त्वचेची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात. तसेच त्वचेला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

स्ट्रेस होतो दूर

कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास त्या व्यक्तीचा स्ट्रेस दूर होण्यास मदत होते. जास्त थकवा आणि स्ट्रेस असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करायला हवी. 

त्वचेवर येतो ग्लो

थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे आरामदायक वाटत असेल तरी याने त्वचेला नुकसान होतं. त्यामुळे कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास त्वचेवरील डाग आणि सुरकुत्याही दूर होण्यास मदत होते. 

सांधेदुखीपासून आराम

थंडीच्या दिवसात अनेकांना सांधेदुखीची समस्या अधिक प्रमाणात सहन करावी लागते. अशावेळी या लोकांनी कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करावी.

त्वचेच्या मृत पेशी होतील दूर

थंडीच्या दिवसात मृत त्वचेची समस्या ही सामान्य बाब आहे. ही मृत त्वचा दूर करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास फायदा होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Salt in winter bathwater: Benefits for skin and joint pain.

Web Summary : Adding salt to warm bathwater in winter cleanses skin, reduces stress, improves glow, eases joint pain, and removes dead skin cells. A simple remedy for winter skin woes.
टॅग्स :त्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी