Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या, कोमजलेल्या चेहऱ्यासाठी वरदान ठरतं बटाट्याचा रस आणि गुलाबजल, पाहा कसा कराल वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:04 IST

Potato and Rose Water Benefits : हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या झटक्यात दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो बटाट्याचा रस आणि गुलाबजलाचा फेस पॅक. पाहा कसा कराल वापर आणि याचे फायदे..

Potato and Rose Water Benefits : थंडीला सुरूवात होताच चेहरा कोरडा आणि निस्तेज दिसू लागतो, अशा वेळी चेहऱ्यावर बटाटा आणि गुलाबजलाचा फेस पॅक लावून पाहा. बटाटा आणि गुलाबजलातील पोषक घटक त्वचेच्या खोलवर पोहोचतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग-चट्टे, सोलवटलेली त्वचा, कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत मिळते. एवढेच नाही तर हा फेस पॅक हिवाळ्यातील ड्रायनेस दूर करून त्वचा मुलायम बनवतो.

हिवाळ्यात बटाटा आणि गुलाबजल लावण्याचे फायदे

- हिवाळ्यात थंड वाऱ्यांमुळे त्वचा अनेकदा कोरडी आणि निर्जीव होते. अशा वेळी ड्रायनेसपासून आराम मिळवण्यासाठी बटाटा आणि गुलाबजल खूप फायदेशीर ठरतं. बटाट्याचा रस आणि गुलाबजल एकत्र येऊन त्वचेला आतून हायड्रेट करतात. त्यामुळे चेहरा अधिक मऊ आणि तजेलदार दिसतो.

- थंड हवेमुळे अनेकांचा चेहरा कोमेजलेला दिसतो. अशा वेळी बटाटा आणि गुलाबजल एकत्र लावल्यास त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. बटाट्यातील व्हिटामिन C आणि गुलाबपाण्याची थंडावा देणारी गुणधर्म मिळून त्वचेला नैसर्गिक ग्लो देतात.

- हिवाळ्यात शरीरातील स्किन रिपेअरिंग प्रक्रिया मंदावते, त्यामुळे चेहऱ्यावर डाग-चट्टे आणि पिग्मेंटेशन दिसू लागते. बटाटा आणि गुलाबजल हे डाग कमी करण्यास मदत करतात. बटाट्याच्या रसातील नैसर्गिक ब्लीचिंग गुण पिग्मेंटेशन हलके करतात, तर गुलाबजल थंडीत होणारी त्वचेची जळजळ शांत करतं.

- हिवाळ्यात डोळ्यांखाली काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल्स दिसत असतील, तर बटाटा आणि गुलाबजलाचा वापर नक्की करा. बटाट्याचा रस डार्क सर्कल्स हलके करतो आणि गुलाबजल डोळ्यांचा थकवा कमी करतं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापर केल्यास डोळ्यांखालील काळेपणा कमी होऊ लागतो आणि डोळे अधिक सुंदर दिसतात.

- हिवाळ्यातही ऑयली स्किन असलेल्या लोकांना पिंपल्सचा त्रास होतो. अशा वेळी बटाटा आणि गुलाबजलाचं कॉम्बिनेशन उपयुक्त ठरतं. दोन्ही घटकांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स निर्माण करणाऱ्या जंतूंना नष्ट करून त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवतात.

चेहऱ्यावर बटाटा आणि गुलाबजल कसे लावावे?

- 1 छोटा बटाटा किसून त्याचा रस काढा. त्यात 1–2 चमचे गुलाबजल मिसळा. कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुऊन मॉइश्चरायझर वापरा.

- बटाट्याच्या रसात 2 चमचे बेसन आणि गुलाबजल मिसळून फेस पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन मॉइश्चरायझर लावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Potato, rose water: A boon for dry, dull skin in winter.

Web Summary : Potato and rose water hydrate skin, reduce dryness, and improve complexion. This combination fades dark circles and fights pimples with its anti-bacterial properties. Use regularly for soft, glowing skin.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स