Join us

१० मिनिटं तुरटीच्या पाण्यात पाय ठेवून बसा, वेदना होतील दूर आणि भेगाही भरतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:57 IST

Alum Benefits On Foot : तुरटी एक असा घरगुती उपाय आहे, जो आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून वापरला जातो. दिसायला जरी ही एक साधी क्रिस्टलसारखी वाटली, तरी तिचे फायदे भरपूर आहेत.

Alum Benefits On Foot : आपण कधी ना कधी पाहिलं असेल की, पुरूषांनी दाढी केल्यानंतर न्हावी चेहऱ्यावर तुरटी फिरवतात. मग सगळ्यांना हेच वाटतं की, तुरटी केवळ दाढी केल्यावर चेहऱ्यावर लावावी आणि पुरूषांच्याच कामात येते. पण असं नाहीये. तुरटी त्वचेला आणि शरीराला अनेक फायदे मिळतात. जे अनेकांना माहीत नसतात. पण तुरटी एक असा घरगुती उपाय आहे, जो आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून वापरला जातो. दिसायला जरी ही एक साधी क्रिस्टलसारखी वाटली, तरी तिचे फायदे भरपूर आहेत. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण मोठ्या प्रमाणात असतात.

दिवसभराच्या धावपळीचा आणि तणावाचा सगळ्यात जास्त त्रास आपल्या पायांना होतो. थकवा, वेदना, सूज आणि फंगल इन्फेक्शन या समस्या कॉमन आहेत. अशावेळी तुरटीचं पाणी वरदानच ठरू शकतं. यानं पायांना आराम तर मिळतोच, सोबतच त्यांना निरोगी ठेवतं आणि कोमल बनवतं.

फक्त 10 मिनिटांचा कमाल उपाय

जर तुम्ही दिवसभर उभं राहून किंवा ऑफिसमध्ये काम करून थकला असाल आणि पायात वेदना जाणवत असतील, तर हा उपाय नक्की करून बघा.

काय करायचं?

एका टबमध्ये बकेटीमध्ये कोमट किंवा थोडंसं गरम पाणी घ्या. त्यात एक छोटा चमचा तुरटी पावडर किंवा एक तुकडा टाका आणि नीट विरघळवा. पाय या पाण्यात साधारण 10 मिनिटं बुडवून ठेवा. तुरटीचं पाणी पायांच्या स्नायूंमधील ताण, थकवा आणि वेदना कमी करतं. हे ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि तणाव दूर करतं.

तुरटीच्या पाण्याचे आश्चर्यकारक फायदे

दुर्गंधीवर उपाय

तुरटीतील अँटी-बॅक्टेरियल गुण पायांतील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करतात. जास्त घामामुळे पायांना येणाऱ्या वासावर हा अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे.

फंगल इन्फेक्शनवर नियंत्रण

तुरटीमध्ये असलेली अँटी-फंगल प्रॉपर्टी पायांवरील अॅथलीट फूट सारख्या संसर्गांवर नियंत्रण ठेवते आणि त्यापासून आराम देते. खाज व जळजळ कमी होते.

फाटलेल्या टाचांसाठी वरदान

तुरटीचं पाणी डेड स्किन सेल्स काढून टाकतं. नियमित वापराने फाटलेल्या टाचा भरू लागतात आणि पाय मऊ होतात.

सूज कमी करतं

तुरटीचे अँटी-इंफ्लेमेटरी गुण पायांतील सूज कमी करण्यात मदत करतात. यामुळे पाय हलके आणि रिलॅक्स वाटतात.

त्वचा उजळवते

फिटकरी पायांची घाण व टॅनिंग कमी करते, ज्यामुळे पाय स्वच्छ आणि चमकदार दिसतात.तुरटी ही जुनी पण अत्यंत परिणामकारक औषधी आहे. पायांना निरोगी, ताजेतवाने आणि मऊ ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा 10 मिनिटं पाय तुरटीच्या पाण्यात ठेवणं हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alum water foot soak: Relieve pain, heal cracks in 10 minutes.

Web Summary : Soaking feet in alum water offers multiple benefits. It reduces pain, eliminates odor, controls fungal infections, heals cracked heels, reduces swelling, and brightens the skin. A simple remedy for healthy, soft feet.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स