Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > आदिती राव हैदरी सांगतेय तिच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट; चेहऱ्याला लावते किचनमधले २ पदार्थ...

आदिती राव हैदरी सांगतेय तिच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट; चेहऱ्याला लावते किचनमधले २ पदार्थ...

Aditi Rao Hydari reveals the secret to glowing skin : अभिनेत्रीला तिच्या सुंदर दिसण्याचं सिक्रेट विचारल्यास  ती स्वयंपाकघर हेच ब्युटी शेल्फ असल्याचं सांगते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:25 IST2026-02-15T16:05:36+5:302026-02-15T16:25:51+5:30

Aditi Rao Hydari reveals the secret to glowing skin : अभिनेत्रीला तिच्या सुंदर दिसण्याचं सिक्रेट विचारल्यास  ती स्वयंपाकघर हेच ब्युटी शेल्फ असल्याचं सांगते.

Aditi Rao Hydari reveals the secret to glowing skin She applies 2 ingredients to Face | आदिती राव हैदरी सांगतेय तिच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट; चेहऱ्याला लावते किचनमधले २ पदार्थ...

आदिती राव हैदरी सांगतेय तिच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट; चेहऱ्याला लावते किचनमधले २ पदार्थ...

अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari ) फक्त आपल्या एक्टींगसाठीच नाही तर स्टाईल आणि सॉफ्ट, ग्लोईंग स्किनसाठीसुद्धा ओळखली जाते.  या अभिनेत्रीच्या चाहत्यांना अनेकदा प्रश्न पडतो की तिच्या ग्लोईंग, सुंदर त्वचेचं सिक्रेट नेमकं काय आहे. तिच्या सौंदर्याचं गुपित घरगुती पदार्थांमध्येच आहे. तिच्या  सकाळची सुरूवात मेकअप किटपासून नाही तर किचनपासून होते. अभिनेत्रीला तिच्या सुंदर दिसण्याचं सिक्रेट विचारल्यास  ती स्वयंपाकघर हेच ब्युटी शेल्फ असल्याचं सांगते. (Aditi Rao Hydari Reveals the Beauty Secret)

अलिकडेच एका मुलाखतीत तिनं सांगितलं की,  सौंदर्याप्रती तिचा दृष्टीकोन आहे तो तिच्या आईशी मिळता जुळता आहे. याची मुळं रोजच्या आहारात दडलेली आहेत. आदिती सांगते की, त्वचेची देखभाल करणं पोषणाचा एक महत्वाचा भाग आहे.  आपण जे खातो तेच त्वचेसाठीही फायदेशीर असते. वांगी सोडून ती इतर अनेक खाद्यपदार्थ त्वचेवर लावण्यासाठी वापरते. 


कच्चं दूध आणि ओट्स-त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यासाठी वापरते. आदिती कच्चे दूध आणि ओट्सचा वापर करते. यामुळे त्वचा मऊ राहते आणि नैसर्गिक चमक येते.  याशिवाय त्वचेवर लावण्यासाठी मध सुद्धा चांगला पर्याय  आहे. मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. तर हळद एंटी सेप्टीक म्हणून काम करते. हे मिश्रण चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करते. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी ती दही आणि बेसनाचा पॅक वापरते. दह्यातील लॅक्टीक एसिड त्वचेचा पोत सुधारते.

महाशिवरात्रीचा उपवास कधी सोडावा-कसा सोडावा? ८ नियम, उपवास सफळ-पित्तही होणार नाही

उन्हामुळे होणारी जळजळ किंवा पुरळ कमी करण्यसाठी ती ताज्या कोरफडीचा गर वापरते.  अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये कोरफडीचा गर वापरला जातो. तसंच तूप खाल्ल्यानं रूप येतं असं म्हणतात त्याप्रमाणे आदितीच्या आहारात आणि स्किन केअरमध्ये तुपाला विशेष महत्व आहे. तूप त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करते. केवळ बाह्य उपचारांवर अवलंबून न  राहता आदिती तिच्या आहारावरही व्यवस्थित लक्ष देते.

बारीक व्हायचंय पण ना डाएटला वेळ ना व्यायामाला? ३० दिवस हा पदार्थ खा, वजन घटणारच..

ती भरपूर पाणी पिते. आहारात बेरीज, हिरव्या पालेभाज्या आणि तांदूळ यांचा समावेश करते. तिच्यामते स्किन केअर हा शरीराच्या पोषणाचा एक भाग आहे. जर तुम्ही आतून निरोगी असाल तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसतो.

Web Title : अदिति राव हैदरी के ग्लोइंग त्वचा का राज: रसोई सामग्री!

Web Summary : अदिति राव हैदरी ने बताया कि उनकी सुंदरता का राज रसोई में है। वह कच्चे दूध और ओट्स का उपयोग करती हैं, शहद और हल्दी लगाती हैं। वह घी भी खाती हैं और स्वस्थ आहार पर ध्यान देती हैं।

Web Title : Aditi Rao Hydari's glowing skin secret: Kitchen ingredients revealed!

Web Summary : Aditi Rao Hydari reveals her beauty secret lies in kitchen ingredients. She uses raw milk and oats for deep cleansing, honey for moisture, and turmeric as an antiseptic. She also incorporates ghee in her diet for hydrated skin and focuses on a healthy diet.