नॅचरल, ग्लोइंग, मिल्की आणि निरोगी त्वचा ही बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीची खास ओळख...बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या पांढऱ्याशुभ्र, नितळ त्वचेची अनेकींना भुरळ पडते. आपल्यापैकी बऱ्याचजणींना अदिती सारखीच पांढरीशुभ्र, मिल्की त्वचा आपली देखील असावी अशी मनोमन इच्छा होतेच. अनेकांना वाटते की असा नॅचरल ग्लो फक्त महागड्या क्रीम्स, सीरम्स किंवा लक्झरी ट्रीटमेंट्समुळेच मिळत असावा. मात्र अदिती राव हैदरी स्वतः सांगते की त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी ती कोणत्याही महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करत नाही. उलट, आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करून ती त्वचा सुंदर आणि हेल्दी ठेवते. आपल्या स्वयंपाक घरातील काही मोजकेच, नेहमीचे साधे पण गुणकारी पदार्थ तिच्या स्किन केअर रुटीनचा महत्त्वाचा भाग आहेत(aditi rao hydari uses kitchen ingredients for skin).
खरंतर. आपल्या आई - आजीच्या काळापासून स्वयंपाक घरातील काही पदार्थ सौंदर्य टिकवण्यासाठी वापरले जात होते. योग्य पद्धतीने आणि नियमित वापर केल्यास (aditi rao hydari kitchen skincare) हे नैसर्गिक पदार्थ त्वचेला पोषण देतात, चमक वाढवतात. पिढ्यांपिढ्या चालत आलेले घरगुती उपाय आणि स्वयंपाकघरातील साधे पदार्थ हेच खरे अदितीच्या त्वचेचे (aditi rao hydari skincare routine) सौंदर्य जपण्यासाठीचे रॉयल सिक्रेट आहे. बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी त्वचेची काळजी घेण्यासाठी नेमके कोणत्या पदार्थांचा वापर करते ते पाहूयात...
बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी सांगते...
अदिती राव हैदरीने नुकतेच एका इंटरव्ह्यू दरम्यान सांगितले की, तिचे स्किनकेअर डेली रुटीन तिला तिच्या आईकडून वारसाहक्काने मिळाले आहे. अदिती स्किनकेअरला पोषणाचा एक भाग मानते. तिच्या मते, ज्या गोष्टी शरीराला आतून निरोगी बनवतात, त्या त्वचेसाठीही फायदेशीर असतात. ती ट्रेंड्स किंवा व्हायरल ब्यूटी रुटीन फॉलो करत नाही, तर आपल्या त्वचेच्या गरजा समजून घेते.
पैठणीचा नवा 'रॉयल' ट्रेंड! पिकॉक-पॅरेट बॉर्डर पाहून पडाल प्रेमात - पिढ्यांपिढ्या जपावी अशी पैठणी...
वर्षभरात केस इंचभरही वाढत नाही? 'असा' करा पोटली मसाज - केस वाढतील भरभर, सांभाळण होईल कठीण...
मुलाखतीदरम्यान अदिती हसत म्हणते, 'मी माझे किचनच चेहऱ्यावर लावते. हे मला माझ्या आईने शिकवले आहे. किचनमध्ये जे काही मिळते, फक्त वांगं सोडून, बाकी सर्व गोष्टी मी चेहऱ्यावर लावते. "मी जे खाते, तेच माझ्या त्वचेवरही बाहेरुन लावते".
अदिती स्वयंपाक घरातील कोणते पदार्थ वापरते ?
१. मध :- मध हे नैसर्गिकरित्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करते. चमचाभर मध रोज त्वचेला लावल्याने त्वचा दीर्घकाळ हायड्रेटेड राहते आणि नैसर्गिक चमक येते. कोरड्या आणि निस्तेज त्वचेसाठी मध अत्यंत फायदेशीर मानले जाते.
२. हळद :- हळदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवतात. हळद डाग कमी करण्यास मदत करते आणि त्वचेचा रंग उजळण्याचे काम करते. योग्य प्रमाणात वापर केल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
३. दही :- दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचा आतून स्वच्छ करते आणि ती मऊमुलायम करते. चेहऱ्यावर दही लावल्याने डेड स्किन निघून जाते आणि त्वचा टवटवीत दिसते. दह्यामुळे त्वचेचे टॅनिंग आणि कोरडेपणा कमी करण्यास देखील मदत होते.
४. ॲलोवेरा जेल :- ॲलोवेरा जेल त्वचेला थंडावा देणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ॲलोवेरा जेल त्वचेला हायड्रेट करते, जळजळ आणि लालसरपणा शांत करते आणि त्वचा मऊमुलायम बनवते. नियमित वापरामुळे चेहऱ्यावर निरोगी आणि फ्रेश ग्लो दिसून येतो.
५. ओट्स :- ओट्स हे एक नॅचरल एक्सफोलिएटर आहे, जे त्वचेवरील मृत पेशी काढण्यास मदत करते. दुधात किंवा गुलाब पाण्यात मिसळून लावल्याने त्वचा स्वच्छ होते आणि त्वचेला इजा न पोहोचता त्वचेचा टेक्श्चर देखील सुधारण्यास मदत होते.
६. खेबरेल तेल :- नारळ तेल कोरड्या त्वचेसाठी एक उत्तम नॅचरल मॉइश्चरायझर मानले जाते. हे त्वचेला खोलवर पोषण देते आणि कोरडेपणा दूर करते. योग्य प्रमाणात वापरल्यास त्वचा मऊ, गुळगुळीत आणि निरोगी राहते.
अदिती राव हैदरीच्या मते, चांगल्या व निरोगी त्वचेसाठी कोणत्याही प्रकारची घाई किंवा महागडे तसेच केमिकल्सयुक्त पर्यायांचा वापर करू नये आणि ट्रेंड्सच्या मागे धावू नये. योग्य खानपान, नैसर्गिक पदार्थ आणि थोडा संयम हाच सौंदर्याचा खरा मंत्र आहे.
