मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

Updated:February 8, 2026 10:30 IST2026-02-08T10:30:00+5:302026-02-08T10:30:02+5:30

floral mangalsutra pendant for married women : floral mangalsutra latest designs : सेलिब्रिटी स्टाईल 'फ्लोरल' मंगळसुत्राची जबरदस्त क्रेझ! फुलांसारखं नाजूक मंगळसूत्र पण दिसायला एकदम भारी...

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

'मंगळसूत्र' हे विवाहित स्त्रीच्या आयुष्यातील फक्त एक दागिना नसून, प्रेम, नातं (floral mangalsutra pendant for married women) आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. बदलत्या काळासोबत मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्येही मोठा बदल झाला आहे. आजकाल महिलांना पारंपरिकतेसोबतच हलके, नाजूक आणि स्टायलिश दागिने आवडतात. याच गरजेतून ‘फ्लोरल’ म्हणजेच फुलांच्या डिझाईन्सचे मंगळसूत्र मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. पारंपारिक वाटीच्या मंगळसूत्राला हा एक आधुनिक आणि स्टायलिश पर्याय ठरत आहे.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

काळानुसार मंगळसूत्रांच्या डिझाइन्समध्ये अनेक बदल झाले आहेत. जड आणि पारंपरिक (floral mangalsutra latest designs) वाट्यांच्या मंगळसूत्रांच्या जागी आता 'फ्लोरल' (Floral) डिझाइन्सची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. फुलांच्या पाकळ्यांसारखी नाजूक नक्षी आणि त्यात गुंफलेले काळे मणी आधुनिक महिलांना भुरळ घालत आहेत.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

फुलांच्या आकारातील किंवा फुलांच नक्षीकाम असलेली मंगळसूत्र डिझाईन म्हणजे फ्लोरल मंगळसूत्र. या डिझाईन्समध्ये गुलाब, कमळ, मोगरा, चाफा, जास्वंद अशा फुलांची नाजूक रचना दिसते. सोनं, डायमंड, रोझ गोल्ड, व्हाइट गोल्ड यांसारख्या विविध धातूंमध्ये ही मंगळसूत्र तयार केली जातात.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

फ्लोरल मंगळसूत्रांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांचा सौम्य आणि एलिगंट लुक. ही मंगळसूत्र फार जड न वाटता रोजच्या वापरासाठी अतिशय सोयीस्कर असतात.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

काळ्या मण्यांच्या पारंपरिक साखळीला फुलांची नक्षी जोडल्यामुळे परंपरा आणि आधुनिक फॅशन यांचा सुंदर मिलाफ दिसतो.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

नाजूक सिंगल फ्लॉवर मंगळसूत्रात मध्यभागी एकच छोटे नाजूक डिझाईनचे फूल असते. हे डिझाईन ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी किंवा 'जीन्स-कुर्ती' घालणाऱ्या तरुणींसाठी परफेक्ट आहे.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

मल्टी-कलर फ्लोरल मंगळसुत्रांतील फुलांच्या पाकळ्यांमध्ये गुलाबी, हिरवा किंवा लाल रंगाची मीनाकारी केली जाते. हे दिसायला अतिशय रंगीबेरंगी आणि फ्रेश वाटते.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

डायमंड फ्लोरल मंगळसुत्रात सोन्याच्या फुलाच्या मध्यभागी किंवा पाकळ्यांवर छोटे हिरे जडवलेले असतात. हे मंगळसूत्र लग्नसमारंभासाठी किंवा पार्टीसाठी 'रॉयल लूक' देते.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

फ्लोरल चोकर मंगळसूत्र गळ्याला घट्ट बसणाऱ्या या मंगळसूत्रात फुलांची मोठी आणि भरगच्च नक्षी असते.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

हे मंगळसूत्र आपण साडीवर तर घालू शकताच, पण ते वेस्टर्न कपड्यांसोबतदेखील तितकेच शोभून दिसते.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

बहुतांश फ्लोरल डिझाईन्स ही वजनाला हलकी असतात, त्यामुळे ती दररोज वापरताना त्रास होत नाही. पारंपारिक मंगळसूत्रापेक्षा हे डिझाईन तुम्हाला चारचौघीत उठून दाखवते.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

जर तुम्ही फ्लोरल मंगळसूत्र घालणार असाल, तर कानातले सुद्धा छोट्या फुलांच्या आकाराचे निवडा. यामुळे तुमचा लूक अधिक बॅलन्स्ड आणि मोहक दिसेल.

मंगळसूत्रात फुलांची सुंदर कलाकुसर! फुलांच्या डिझाईनचं मंगळसूत्र देतं रॉयल लुक - पाहा हटके ट्रेंडिंग डिझाईन्स...

नाजूक फुलांच्या डिझाईन्समुळे मंगळसूत्र खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतं, यासोबतच प्रत्येक लुक अधिक खास होतो.