बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि फ्रेश दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अदा शर्माच (Adah Sharma) नाव देखील आवर्जून घेतलं जात. अदा शर्माला पहाताच सगळ्यात आधी तिच्या सुंदर त्वचेची सगळ्यांनाचं भूरळ पडते. तिच्या सौंदर्याची, विशेषतः तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक आणि तेजस्वी, ग्लोईंग लकाकीची चर्चा नेहमीच होत असते. अनेकदा आपण स्किन ग्लो करण्यासाठी, महागड्या क्रिम्स आणि पार्लरच्या ट्रिटमेंट्समध्ये वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करतो, पण खरं सौंदर्य आतून येतं. अदा शर्मा देखील याच गोष्टीवर विश्वास ठेवत, त्वचेची फक्त वरुन काळजी न घेता ती आतून कशी स्वच्छ ठेवता येईल याकडे अधिक लक्ष देते(Adah sharma shared easy carrot recipe for glowing skin).
आपल्यापैकी अनेकजणींना मोठमोठ्या सेलिब्रिटी, अभिनेत्रींचे स्किनकेअर रुटीन जाणून घेण्याची कायमच उत्सुकता असते. अलीकडेच अदा शर्मा ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या स्किन केअर डाएटचा एक महत्त्वाचा भाग असलेली गाजराची सुपर हेल्दी डिश (Carrot Healthy Dish) शेअर केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ही डिश रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास त्वचेला आतून पोषण मिळते, डिटॉक्स होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते. गाजरात असलेले व्हिटॅमिन ए, अँटिऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन त्वचेतील डलनेस कमी करून स्किनला ग्लो देतात. अदा शर्माची ही हेल्दी डिश फक्त त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही, तर शरीराला एनर्जी देण्यासाठीही उत्तम पर्याय आहे. अदा शर्मा दररोज गाजराची कोणती खास आणि सुपर हेल्दी डिश खाते, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर नेहमी चमक कायम राहते ते पाहूयात...
अदा शर्माच्या ग्लोइंग स्किन व फिटनेसचे सिक्रेट...
१ कप गाजर (किसलेलं), १ टेबलस्पून मध, १ टेबलस्पून मोहरीचे तेल, मीठ चवीनुसार, १/२ टेबलस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार लिंबाचा रस, १ टेबलस्पून पांढरे तीळ इतके साहित्य लागणार आहे.
सोहा अली खान रोज सकाळी पिते ‘या’ भाजीचा रस, सांगते-तिच्या दिवसभर फिट राहण्याचं सोपं सिक्रेट....
कृती :-
अदा शर्मा खाते तो खास पदार्थ तयार करण्यासाठी, सर्वात आधी गाजर स्वच्छ धुऊन, त्याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत. आता या कापलेल्या गाजरांमध्ये मध, मोहरीचे तेल, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि सर्वात शेवटी पांढरे तीळ वरुन भुरभुरवून घ्या. हेल्दी व पौष्टिक डिश खाण्यासाठी तयार आहे.
ही हेल्दी व पौष्टिक डिश खाण्याचे फायदे...
१. गाजर :- गाजरमध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला निरोगी आणि चमकदार करतात. हे पोषक घटक त्वचेचे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत करतात आणि सुरकुत्या देखील कमी करतात.
२. मध :- मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेला मऊ आणि हायड्रेटेड ठेवते. यात अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुरुम आणि सूज कमी करतात. मध त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्याचेही काम करते.
३. पांढरे तीळ :- पांढऱ्या तिळामध्ये व्हिटॅमिन 'ई' आणि फॅटी ॲसिड्स असतात. जे त्वचेला आवश्यक पोषण देण्याचे काम करतात. हे घटक एजिंगशी संबंधित खुणा लपवण्यास मदत करतात. तसेच, यामुळे कोरड्या त्वचेच्या समस्येपासूनही बचाव होतो. तिळाच्या वापरामुळे त्वचा मऊ होते.
४. लिंबाचा रस :- लिंबामध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास आणि ती चमकदार बनवण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील काळे डाग आणि इतर डाग देखील कमी होतात.