Lokmat Sakhi >Beauty > केरळ स्टोरी फेम अदा शर्माची त्वचा एवढी सुंदर कशी? अदाने सांगितले तिच्या चमकत्या त्वचेचे सिक्रेट

केरळ स्टोरी फेम अदा शर्माची त्वचा एवढी सुंदर कशी? अदाने सांगितले तिच्या चमकत्या त्वचेचे सिक्रेट

Adah Sharma revealed the secret to her glowing skin अदा शर्माची त्वचा एवढी छान कशी? अदाने सांगितले त्वचेसाठी काय करायचे. जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 14:00 IST2025-05-29T13:59:33+5:302025-05-29T14:00:23+5:30

Adah Sharma revealed the secret to her glowing skin अदा शर्माची त्वचा एवढी छान कशी? अदाने सांगितले त्वचेसाठी काय करायचे. जाणून घ्या.

Adah Sharma revealed the secret to her glowing skin | केरळ स्टोरी फेम अदा शर्माची त्वचा एवढी सुंदर कशी? अदाने सांगितले तिच्या चमकत्या त्वचेचे सिक्रेट

केरळ स्टोरी फेम अदा शर्माची त्वचा एवढी सुंदर कशी? अदाने सांगितले तिच्या चमकत्या त्वचेचे सिक्रेट

अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या फार चित्रपटांमध्ये दिसत नाहीत मात्र तरी त्या फार लोकप्रिय असतात. (Adah Sharma revealed the secret to her glowing skin)अशीच एक अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा. अदा तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिच्याबद्दल अनेकांची अनेक मते आहेत, पण एक गोष्ट सगळ्यांनाच मान्य करावी लागेल ती म्हणजे अदाची त्वचा फारच स्वच्छ आणि सुंदर आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही डाग नाहीत. अदा कायम नैसर्गिक उपाय करताना दिसते. तिच्या इंस्टाग्राम पेजवरही ती काही ना काही सारखे सांगत असतेच. व्यायाम करण्याचा सल्ला असो वा स्किन केअर रुटीन असो अदा कायम उपयुक्त टिप्सच सांगते. 

अदाला एका मुलाखतीत तिच्या त्वचेबद्दल विचारले असता ती म्हणाली, त्वचा सुंदर दिसावी यासाठी आहार महत्त्वाचा असतो. अदाचे स्किन केअर रुटीन हे तिच्या आहारातच आहे असे. आहार योग्य घेतला की इतर उपाय करावे लागणार नाहीत.  तुम्ही काय खाता हे तुमच्या शरीरावर दिसते. त्यामुळे चांगला आहार घेणे गरजेचे आहे. आहारात त्वचेसाठी चांगले आणि पौष्टिक ठरणारे पदार्थ असायला हवेत. जसे की विविध प्रकारच्या बिया असणे गरजेचे आहे. बिया खाणे पौष्टिक असते. (सूर्यफुलाच्या बिया, लाल भोपळा, इत्यादी ) तसेच रोज सुकामेवा खा. सगळे प्रकार खायचे. फक्त काजू बदाम नाही. इतरही अनेक प्रकार आहेत ते ही खा.  बीट खाणे त्वचेसाठी फायद्याचे ठरते. तसेच शेंगा खाणेही उपयुक्त ठरते.         

अदा आणखी एक उपाय करते तो म्हणजे ती अंघोळ करताना मुलतानी माती लावते. अदाने सांगितल्याप्रमाणे तिला चेहऱ्यावर बरेच डाग व पिंपल्स होते जे फक्त मुलतानी मातीच्या लेपामुळे नाहीसे झाले. मात्र किमान एक महिना सातत्याने मुलतानी माती लावणे गरजेचे आहे. महिन्याभरानंतर परक पडायला सुरवात होईल. मुलतानी माती पाण्यात मिसळायची. त्याची पेस्ट तयार करायची. ती चेहऱ्याला लावायची तसेच संपूर्ण शरीराला लावायची. थोडावेळ ठेवायची आणि मग पाण्याने अंघोळ करायची. मुलतानी माती टॅनिंग घालवते. त्वचा स्वच्छ करते. इतरही अनेक फायदे आहेत. 

Web Title: Adah Sharma revealed the secret to her glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.