Join us

केमिकल्सचा नाद सोडा या फळाच्या सालीनं पिवळे दात चमकदार करा, खर्चही येईल कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:29 IST

Yellow teeth : काही नॅचरल उपाय अधिक फायदेशीर ठरतात. असाच एक सोपा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका फळाच्या सालीच्या मदतीनं तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता.

Yellow Teeth Home Remedies: दातांची जर योग्यपणे काळजी घेतली गेली नाही तर त्यांवर पिवळे डाग दिसू लागता. ज्यामुळे चारचौघात बिनधास्त हसण्यास लाज वाटते आणि पिवळे दात चांगलेही दिसत नाहीत. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, योग्य काळजी न घेणे, वाढतं वय, दातांमधील किड आणि तंबाखू - गुटख्यामुळे दातांवर पिवळेपणा येतो. अशात आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी काही वेगळे उपाय करणं गरजेचं ठरतं. बरेच लोक दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी केमिकल्सचा वापर करतात, पण हे केमिकल्स दातांचं अधिक नुकसान करू शकतात. अशात काही नॅचरल उपाय अधिक फायदेशीर ठरतात. असाच एक सोपा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका फळाच्या सालीच्या मदतीनं तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता.

पिवळे दात चमकदार करण्यासाठी केळीची साल

एक्सपर्ट सांगतात की, केळ्याची साल तुमच्या दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. या सालीचा योग्यपणे जर वापर केला गेला तर तुम्हाला चारचौघात कधीच तोंड झाकून हसावं लागणार नाही. महत्वाची बाब म्हणजे या उपायाचे कोणते साइड इफेक्ट्सही नाहीत आणि यासाठी खर्चही जास्त लागणार नाही.

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी केळीच्या सालीवरील पांढरा गर चमच्या मदतीनं काढून घ्या. नंतर त्या 2 चिमुट हळद आणि थोडं मीठ टाका. हे चांगलं मिक्स करा. आता हे मिश्रण ब्रशवर लावून दात घासा. दातांवर हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा. दातांवरील पिवळेपणा दूर झालेला दिसेल आणि दात चमकदार होतील. 

केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज सारखे खनिजं असतात. जे दातांवरील डाग दूर करण्यास मदत करतात. 

इतरही काही उपाय

- बेकिंग सोड्याच्या मदतीनं सुद्धा तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता. बेकिंग सोड्यात थोडं पाणी टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट दातांवर बोटाच्या मदतीनं हलक्या हातानं घासा. काही दिवस हा उपाय केल्यास दातांवरील पिवळे डाग जातील.

- खोबऱ्याचं तेल सुद्धा दातांसाठी खूप फायदेशीर ठरतं. हे वापरण्यासाठी खोबऱ्याचं एक ते 2 चमचे तेल घ्या आणि तोंडात काही वेळासाठी तसंच ठेवा. नंतर हे तेल तोंडात सगळीकडे फिरवा. 5 ते 10 मिनिटं असं केल्यावर तेल थुंका. त्यानंतर पाण्यानं गुरळा करा. तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्य