Join us

चेहऱ्यावर नेहमीच पुरळ, सुरकुत्या येण्यासाठी कारणीभूत फूड्स, डॉक्टरांनी सांगितली लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 11:23 IST

Skin Care And Diet: डॉक्टर सुगन्या नायडू यांनी अशा फूड्सबाबत सांगितलं जे त्वचेसाठी जास्त नुकसानकारक असतात. त्याच पदार्थांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

Skin Care And Diet: तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपलं खाणं-पिणं चांगलं असणं खूप महत्वाचं असतं. चुकीच्या खाण्या-पिण्याचा आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो. त्वचेवरही खाण्या-पिण्याचा परिणाम दिसून येतो. आजकाल जास्तीत जास्त लोक फास्ट फूड आणि मसालेदार पदार्थ खातात. ज्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेचं सुद्धा नुकसानही होतं. त्वचेवर नेहमीच पुरळ येऊ लागते. अशात डॉक्टर सुगन्या नायडू यांनी अशा फूड्सबाबत सांगितलं जे त्वचेसाठी जास्त नुकसानकारक असतात. त्याच पदार्थांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

त्वचेसाठी नुकसानकारक फूड्स

डॉक्टर सुगन्या नायडू सांगतात की, डेअरी प्रोडक्ट्समुळे अ‍ॅक्ने (Acne) ची समस्या होऊ शकते. तेच जर जास्त प्रमाणात साखर खाल्ली तर त्वचेवर सुरकुत्या येण्याची समस्या होऊ शकते. जास्त तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाल्ल्यानं त्वचा तेलकट होऊ शकते. नेहमीच जर व्हाइट ब्रेड खात असाल तर त्वचेवर ब्रेकआउट्स होऊ शकतात. डॉक्टर सांगतात की, चॉकलेट खाल्ल्यावर पिंपल्सची समस्या वाढते. प्रोसेस्ड मीट नेहमीच खात असाल तर इन्फ्लामेशनची समस्या होते. त्याशिवाय आर्टिफिशिअल स्वीट्स खाल्ल्यानं त्वचेवर रॅशेज येतात. शेवटी डॉक्टर सांगतात की, अल्कोहोल नियमित प्यायल्यानं त्वचा सैल पडू शकते आणि ड्राय होते. 

हेल्दी त्वचेसाठी काय खावे?

- टोमॅटो त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. टोमॅटोमध्ये अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सअसतात, जे त्वचा डॅमेज होण्यापासून बचाव करतात. तसेच त्वचेवर फाइन लाइन्सही होऊ देत नाहीत.

- गाजरमध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं, ज्याला शरीरात व्हिटामिन ए मध्ये रूपांतरित करतं. व्हिटामिन ए त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं.

- त्वचेसाठी ड्रायफ्रुट्स आणि बिया सुद्धा महत्वाच्या ठरतात. यांमध्ये झिंक आणि वेगवेगळे व्हिटामिन असतात, ज्यामुळे त्वचेचं टेक्स्चर चांगलं होतं.

- पालकासोबतच इतरही वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या त्वचा आतून साफ ठेवण्यास मदत करतात. हिरव्या भाज्यांमुळे त्वचेवर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येत नाहीत.

- उन्हाळ्यात खाल्लं जाणारं कलिंगडही त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. कलिंगडामधून त्वचेला अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. ज्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो आणि त्वचा तरूण दिसते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स