Anti Aging Foods: तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, असे बरेच लोक असतात जे चाळीशीतही 25 किंवा 30 वयाचे दिसतात. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अजिबात अंदाज लावता येत नाही. कारण त्यांचा आहार चांगला असतो. त्यांची लाइफस्टाईल हेल्दी असते आणि ते त्वचेची योग्य ती काळजी घेतात. त्यामुळेच त्यांचं वय जास्त असूनही ते कमी वयाचे दिसतात. ते नियमितपणे असे अॅंटी-एजिंग फूड्स खातात म्हणजे तुम्हाला नेहमीच तरूण ठेवणारे फूड्स किंवा वाढत्या वयाचा प्रभाव दिसू न देणारे फूड्स खातात. डॉक्टर रवि के गुप्ता यांनी अशाच काही फूड्सबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांचा सल्ला आहे की, या फूड्सचा आहारात समावेश केल्यानं वाढत्या वयातही तुम्ही तरूण दिसाल.
नेहमीच तरूण ठेवणारे फूड्स
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट (Dark Chocolate) मध्ये 70 टक्के कोकोआ असतं. यात फ्लेवेनॉइड्स असतात जे त्वचेला हायड्रेटेड ठेवतात. तसेच सूर्याच्या प्रखर किरणांमुळे होणारं त्वचेचं डॅमेज 20 ते 30 टक्के कमी करतात.
बेरीज
बेरीजमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामिन सी भरपूर असतं. जे त्वचेसाठी आवश्यक कोलेजनचं प्रोडक्शन वाढवतात. बेरीज खाल्ल्यानं त्वचेवर दिसून येणारी वाढत्या वयाची लक्षणं म्हणजे सुरकुत्या आणि फाइन लाइन्स 8 ते 12 टक्के कमी होतात.
डाळिंब
डाळिंबामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात, जे त्वचेवर कोलेजन वाढवण्यास मदत करतात. तसेच त्वचेचं सूर्याच्या प्रखर किरणांपासून रक्षणही होतं. हॉवर्ड स्टडीनुसार, डाळिंबाचा ज्यूस रोज प्यायल्यानं एजिंग 15 ते 20 टक्के कमी होते.
चिया सीड्स
चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि प्रोटीन भरपूर असतं. चिया सीड्स नियमितपणे खाल्ल्यास त्वचेवरील इन्फेक्शन कमी होतं आणि रॅडिकल्स डॅमेजपासून त्वचेचा बचाव होतो. चिया सीड्समुळे कोलेजनचं प्रोडक्शन सुद्धा वाढतं.
अॅवोकाडो
अॅवोकाडो हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असं एक फळ आहे. यातील हेल्दी फॅट्स आणि व्हिटामिनमुळे त्वचा हायड्रेटेड राहते. ज्यामुळे त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं कमी होतात. त्यामुळे नियमितपणे तुम्ही अॅवोकाडो हे फळं खायला हवं.