दिवाळी म्हणजे उत्साह आणि आनंदाचा सण. सगळेच मस्त नटून-थटून छान तयार होतात. या काळात चेहरा, त्वचा आणि केस यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. ( 7 tips to Look beautiful during diwali season , take care of your skin with easy steps )घरच्या घरी काही सोप्या उपाय करुन तुम्ही दिवाळीच्या दिवशी ताजेतवाने आणि सुंदर दिसू शकता. त्यासाठी रसायनयुक्त काही उपाय न करता घरगुती उपायच करा.
१. घरचा फेसपॅक: बेसन, दही आणि थोी हळद एकत्र करुन पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर आणि मानेला लावा, २० मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे त्वचा स्वच्छ, मऊसर आणि नैसर्गिकरीत्या चमकदार दिसते.
२. पुरेशी झोप: दिवाळीत खरेदी, भेटवस्तू आणि जागरणांमुळे झोप कमी होते. पुरेशी झोप घेतल्यास चेहरा छान खुल्लेला दिसतो. त्यामुळे वेळेत झोपण्याचा प्रयत्न करा.
३. पाणी आणि हायड्रेशन: दिवसातून कमीतकमी ८ ग्लास पाणी प्या. हे त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर काढते आणि त्वचा सॉफ्ट राहते. तसेच ऑक्टोबर हीटमध्ये शरीराला पाण्याची गरज जास्त असते.
४.संतुलित आहार: ताजी फळे, भाज्या, काकडी, गाजर, दूध, दही आणि मूग डाळ यांचा समावेश आहारात करा. तळलेले, जास्त गोड किंवा तेलकट पदार्थ कमी खा, ज्यामुळे त्वचेवर मुरुम किंवा तेलकटपणा येणार नाही.
५. केसांची काळजी: केसाला तेल लावून हलका मसाज करा. कोमट पाण्याने धुवून केस मऊसर आणि चमकदार ठेवा. दिवाळीत सगळीकडे भरपूर धूळ आणि धूर असतो. त्यापासून वाचा. चेहऱ्याला आणि केसांना स्कार्फ बांधा.
६. हात आणि नखे: हात स्वच्छ धुवून हलके तेल लावा. नखे नीट कापा. नखात घाण असेल तर काढून घ्या. हँड क्रीम वापरणे देखील फायदेशीर ठरते.
७. डोळ्यांची काळजी: डोळ्याभोवती जास्त मेकअप नका करु. हलकाच मेकअप करा. उन्हामुळे मेकअप चेहऱ्यावर फुटतो. त्यामुळे त्यानुसार मेकअप करा.
कोणतेही उपाय करण्याआधी काळजी घ्या. विविध ऑफर्स दिवाळीमध्ये चालू असतात. स्वस्तात मिळाले म्हणून कोणतेही प्रॉडक्ट्स वापरु नका. त्यामुळे त्वचा खराब होते. विश्वासू आणि अनेक वर्षे वापरले जाणारेच उपाय करा. रासायनिक प्रॉडक्ट्स कमीच वापरा. घरगुती उपाय करत राहा.