Join us

फेस फॅट वाढून चेहरा वयस्क - थोराड दिसतो? ५ सवयी, तारुण्य परत येईल कायमचं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 19:21 IST

5 Tips To Lose Face Fat : 5 Incredible Ways To Get Rid Of Face Fat : 5 Effective Tips to Lose Fat in Your Face : How to lose face fat 5 effective tips : चेहऱ्यावर फॅट्स जमा होऊन चेहरा कायम सुजलेला-गुबगुबीत दिसतो, यासाठी करा हे उपाय..

आपला चेहरा समोरच्याला सगळं काही सांगून जातो. चेहरा हीच आपली ओळख मानली जाते. यासाठीच, आपला चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक असावा असं प्रत्येकीला कायम (5 Tips To Lose Face Fat) वाटत असत. गालांवर आणि चेहऱ्यावर साचलेलं अतिरिक्त चरबीचं प्रमाण म्हणजेच फेस फॅट्स फक्त सौंदर्यावरच परिणाम ( 5 Incredible Ways To Get Rid Of Face Fat) करतं असं नाही, तर ते आपल्यातील आत्मविश्वास (5 Effective Tips to Lose Fat in Your Face) देखील कमी करते. अनेकदा शरीराचं वजन कमी झालं तरी चेहऱ्यावरची चरबी तशीच राहते. आत्तापर्यंत बऱ्याचजणींना या फेस फॅट्सच्या समस्येला सामोरे जावे लागले असेल. एकूणच काय तर फेस फॅट्स आपले संपूर्ण व्यक्तिमत्त्वही बिघडवू शकते(How to lose face fat 5 effective tips).

अनेकदा एक्सरसाइज आणि डाएट करूनही चेहऱ्यावरचं फॅट कमी होत नाही, ज्यामुळे निराशा वाटू लागते. परंतु आपण घरच्याघरीच काही सोपे उपाय नियमितपणे फॉलो करून नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावरील फेस फॅट्स कमी करु शकतो. फेस फॅट्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय फॉलो करून आपण पुन्हा चेहऱ्याला शार्प, टोन्ड लुक देऊ शकता. चेहऱ्यावरील फेस फॅट्स कमी करण्यासाठी सहज करता येणारे घरगुती उपाय कोणते आहेत, ज्यामुळे आपला चेहरा अधिक सुंदर व आकर्षक दिसू शकतो ते पाहूयात... 

फेस फॅट्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय करता येतील ? 

१. कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज करा :- जसं शरीरतील फॅटस कमी करण्यासाठी नियमित व्यायाम केला जातो, तसंच कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइजमुळे फेस फॅटस कमी करण्यास मदत होते. यासाठी आपण पोहणं, धावणं किंवा डान्सिंग यांसारख्या ॲक्टिव्हिटी करू शकता. अशा प्रकारच्या व्यायामांनी शरीरातील चरबी लवकर जळते आणि त्याचा सकारात्मक परिणाम चेहऱ्यावरही दिसू लागतो.

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

२. योग्य डाएट फॉलो करा :- वजन कमी करण्यासाठी डाएट करणं गरजेचं असतं, तसंच फेस फॅट कमी करण्यासाठीही योग्य आहार तितकाच महत्त्वाचा असतो. संतुलित आहारात हंगामी भाज्या आणि फळांचा समावेश करा. तसेच प्रोसेस्ड फूड, आर्टिफिशियल साखरयुक्त पेय आणि जास्त सोडियमयुक्त पदार्थ आहारातून टाळा, असे पदार्थ फेस फॅटस वाढवण्यास हातभार लावतात.

३. दिवसभरात पुरेसे पाणी प्या :- शरीराचं वजन कमी करण्यासाठी पुरेसं पाणी प्यायला हवं, असं नेहमी सांगितलं जातं. कारण दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. अशा प्रकारे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं, जे वजन कमी करण्यास मदत करतं. यामुळे चेहऱ्यावरील फॅटही हळूहळू कमी होऊ लागतात. 

४. फेशियल एक्सरसाइज करा :- फेस फॅटस कमी करण्यासाठी काही फेशियल एक्सरसाइजला आपल्या डेली रुटीनमध्ये समाविष्ट करणे फायदेशीर ठरते. फेशियल एक्सरसाइजमध्ये चीक पफ्स, चिन लिफ्ट्स यांसारखे एक्सरसाइज करु शकता. हे एक्सरसाइज केल्याने जॉलाइन सुधारते आणि फेस फॅटही लवकर कमी होतं.

पावसाळ्यात नाजूक जागी खाज - फंगल इन्फेक्शन होते? ४ टिप्स, योग्य काळजी घ्या, नाहीतर वाढतो त्रास...

५. स्ट्रेस घेऊ नका :- स्ट्रेस घेतल्याचा आपल्या शरीराच्या वजनावर मोठा परिणाम होतो. जर फेस फॅट कमी करायचं असेल, तर ताणाचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. ताणामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे वजन वाढतं आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसून येतो. इतकंच नव्हे तर स्ट्रेस घेतल्याने  चेहऱ्याची चमकही कमी होते. जर आपल्याला चेहऱ्याचं फॅट कमी करायचं असेल, तर स्ट्रेसवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स