डार्क सर्कल्स चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम करतात. डार्क सर्कल्समुळे व्यक्ती आजारी दिसू लागतो. ज्यामुळे थकवा येणं, ताण-तणाव, झोपेची कमतरता असे त्रास उद्भवतात, हे कमी करणं सोपं नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही चेहऱ्याची चमक वाढवू शकता. त्वचा निरोगी आणि फ्रेश राहते. (How To Remove Dark Circles)
काकडी, बटाटा ब्लिचिंग गुण असतात. डार्क सर्कल्स हलके होण्यास मदत होते. काकडीचे स्लाईस कापून थंड करा डोळ्यांवर ठेवा. १० ते १५ मिनिटं डोळ्यांवर ठेवून आराम करा. या प्रक्रियेमुळे डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत होईल आणि डोळ्यांना गारवा मिळण्यास मदत होते. बटाटे किसून घ्या, नंतर रस काढून डोळ्यांना लावा. या टिप्सच्या मदतीनं तुमचा स्किन टोन लाईट होण्यास मदत होते. (5 Simple Home Remedies Remedies To Remove Dark Circles)
१) गुलाब पाणी आणि टि बॅग्स
गुलाब पाणी एक नॅच्युरल टोनर आहे. त्यामुळे त्वचा थंड आणि मॉईश्चराईज राहण्यास मदत होते. गुलाब पाण्यात कापूस बूडवून डोळ्यांवर १५ मिनिटांसाठी ठेवा नंतर आराम करा. ज्यामुळे डार्क सर्कल्स कमी होतील आणि डोळ्यांचा थकवा कमी होईल. टि बॅग्स, खासकरून ग्रीन टी बॅग्स डोळ्यांना आराम देतात. एंटी ऑक्सिडेंट्स आणि टॅनिन त्वचेला निरोगी ठेवतात आणि डार्क सर्कल्स कमी करतात.
२) बदाम तेल आणि नारळाचं तेल
बदामाचं तेल आणि नारळाचं तेल डार्क सर्कल्स हटवण्यास प्रभावी ठरतात. रात्री झोपण्याआधी बदामाचे तेल लावून डोळ्यांच्या खाली मसाज करा. ज्यामुळे त्वचेला पोषण मिळेल आणि डार्क सर्कल्स हलके होतील. नारळाचं तेल त्वचेला मॉईश्चराईज ठेवते आणि नियमित हा व्यायाम केल्यानं त्वचेची चमक वाढते.