केस गळण्याचे एक मुख्य कारण म्हणजे केसात झालेला कोंडा. केसाची मुळे कमकुवत करण्याचे काम हा कोंडा करतो. मात्र कोंड्यामुळे इतरही अनेक त्रास होतात. (5 reasons why dandruff does not reduce, see types of dandruff)कोंड्यामुळे प्रचंड कंड सुटते. अगदी असह्य अशी खाज सुटते त्यामुळे खाजवल्याशिवाय समाधान मिळत नाही. पण खाजवल्यामुळे रॅश उठतात. नखांमुळे त्वचा ओढली जाते. कोंडा कमी व्हावा यासाठी आपण विविध उपाय करतो. शाम्पू बदलतो. साबण बदलतो. विविध प्रॉडक्ट्स वापरुन बघतो.
आपल्याला कोणीतरी सुचवते की असा असा उपाय करा म्हणजे कोंडा कमी होईल. मात्र त्या व्यक्ती प्रमाणे आपल्याला त्या उपायाचा फायदा होत नाही. असे का होते? कारण कोंड्यामध्ये प्रकार असतात. कोंडा दिसला जरी सारखाच तरी त्याचे प्रकार आणि उपाय दोन्ही वेगळे असते. (5 reasons why dandruff does not reduce, see types of dandruff)त्यामुळे कोंडा झाल्यावर दुर्लक्ष करु नका. त्याचे कारण जाणून घ्या. कोणत्या प्रकारचा कोंडा झाला आहे ते समजून घ्या.
१. त्वचा कोरडी असल्यावर हवामानामुळे किंवा व्यवस्थित काळजी न घेतल्याने सुका कोंडा होतो. गरम पाण्याने केस धुतल्यानेही कधीकधी कोंडा वाढतो. त्वचेला आर्द्रतेची गरज असते. मात्र त्वचा कोरडी असल्याने आर्द्रता कमी पडते. आणि कोंडा होतो. ड्राय स्किन डॅण्डरफ पांढऱ्या रंगाच्या लहान कणाच्या स्वरुपात असतो आणि फार कॉमन आहे.
२. त्वचा तेलकट असल्यावर टाळूवरही तेलकटपणा असतो. त्यामुळे चिकट कण असलेला डॅण्डरफ होतो. जाता जात नाही. चिकटून राहतो. पिवळसर रंगाचे डागही सोडतो. सारखी खाज सुटते. त्यामुळे तेलकट त्वचा असल्यास जास्त काळजी घ्यावी. कारण असा कोंडा लवकर जात नाही.
३. सेबोरिक डर्माटोयटिस हा एक प्रकारे आजारच आहे. सारखी खाज सुटते. त्वचा लालसर होतो. टाळू तेलकट होतो. शरीरात मालासेझिया नावाचा एक यीस्ट वाढतो. तो वाढल्यामुळे असा कोंडा होतो. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल.
४. जसे शरीरावर फंगल इंन्फेक्शन होते तसेच केसातही होते. मालासेझिया ग्लोबोसा या नावाचा एक फंगस केसात वाढतो त्यामुळे मग कोंडा होतो. तेलकट त्वचा असेल तर जास्त वाढतो. खाज, जळजळ, लाल डाग इतरही अनेक त्रास होतात.
इतरही अनेक गोष्टी असतात. त्यामुळे कोंडा झाल्यावर घरगुती उपाय कार. मात्र जर कोंडा जाता जात नसेल तर वेळीच वैद्यकीय उपाय करा. कोंडा अति पसरला तर फार त्रासदायक ठरु शकतो.