ऊन, पाऊस, वारा आणि प्रदूषण याचा त्वचेवर परिणाम होतो. त्वचा काळवंडते. टॅनिंग होतं. तसेच इतरही काही त्रास होतात. आजकाल वॅक्सिंग केल्याशिवाय महिला घराबाहेर पडतच नाहीत. (5 natural remedies to reduce facial hair and tanning on arms and legs, no need for a razor, skincare tips )मात्र सतत रेझर आणि विविध प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे त्वचा खराब होतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उफाय करणे जास्त फायद्याचे आहे. हातापायांवरील केस आणि टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर हा एक नैसर्गिक, सुरक्षित आणि खर्चिकदृष्ट्या परवडणारा मार्ग आहे. रसायनांचा मारा न करता आणि सहज उपलब्ध घटकांचा वापर करून आपण त्वचेला स्वच्छ, उजळ आणि मुलायम बनवू शकतो.
१. टॅनिंग कमी करण्यासाठी लिंबाचा रस अत्यंत प्रभावी आहे. लिंबामध्ये सॅट्रिक अॅसिड असते जे त्वचेवरील मृतत्वचा आणि गडद डाग दूर करण्यास मदत करते. लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण हातापायांवर लावून १५ ते २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवायचे. यामुळे टॅनिंग हळूहळू कमी होते. या उपचारासोबत काकडीचा रस आणि कोरफड जेलही वापरावे. जे त्वचेला थंडावा देईल आणि खराब त्वचा पुन्हा सुंदर करेल.
२. हळद आणि बेसन यांचे मिश्रण देखील टॅनिंगसाठी लाभदायक आहे. २ चमचे बेसनात चिमूटभर हळद, थोडे दूध किंवा गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आठवड्यातून ३ वेळा लावल्यास त्वचा उजळते आणि टॅनिंग कमी होते.
३. हातापायांवरील केस कमी करण्यासाठी साखर आणि लिंबाचा एक घरगुती स्क्रब उपयुक्त ठरतो. २ चमचे साखर, १ चमचा लिंबाचा रस आणि थोडं पाणी एकत्र करून ही पेस्ट केसांच्या विरुद्ध दिशेने हलक्या हाताने चोळायची. ही क्रिया आठवड्यातून दोनदा केल्यास केसांचे घनत्व हळूहळू कमी होते.
नियमित स्क्रबिंग आणि मॉइश्चरायझिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरफडीचा रस किंवा नारळ तेलाने मालिश केल्यास त्वचा नितळ राहते आणि केस वाढण्याचा वेग कमी होतो. पुरेसे पाणी पिणे फार गरजेचे असते. पौष्टिक आहार घ्यायचा आणि सूर्यप्रकाशात बाहेर पडताना हातपाय झाकले जातील याची काळजी घ्यायची. जर तुम्हाला सारखे टॅनिंग होते, तर सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे.