ओठ हा चेहर्याचा नाजूक भाग असल्याने त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. सतत कोरडे हवामान, उन्हाचा तडाखा आणि पाण्याची कमतरता यामुळे ओठ फाटतात. अनेक वेळा जास्त प्रमाणात लिपस्टीक किंवा केमिकलयुक्त लिपबाम वापरल्यानेही ओठ खराब होतात. धूळ, प्रदूषण आणि धूम्रपान यांचा परिणाम ओठांच्या रंगावर दिसतो. योग्य आहार आणि पाणी कमी पिणे यामुळे ओठ कोरडे व काळे पडतात. काहीजण ओठ चावण्याची सवय असते, त्यामुळे त्वचा सोलली जाते.(5 homemade packs to keep lips soft and pink, make them quickly and apply them everday- very necessary in winter) ही समस्या दुर्लक्षित राहिल्यास ओठ कायमच कोरडे दिसतात. त्यामुळे बाजारातील कृत्रिम उत्पादने टाळून घरगुतीच उपाय करणे योग्य ठरते. नैसर्गिक घटकच ओठांचे खरे सौंदर्य टिकवून ठेवतात.
१. ओठ सुंदर ठेवणारा एकदम मस्त पदार्थ म्हणजे तूप. घरी केलेले साजूक तूप ओठांना लावणे फार फायद्याचे ठरते. ओठ मऊ होतात आणि मुलायम राहतात. दिसतातही सुंदर. तूप हा ओठांसाठी एक नैसर्गिक पोषण देणारा घटक आहे. त्यात असलेले फॅटी अॅसिड आणि जीवनसत्वे त्वचेला आतून मऊपणा देतात. ओठांवरील कोरडेपणा आणि फाटलेली त्वचा बरी करुन नैसर्गिक गुलाबीपणा आणतात. तूप ओठांवर लावल्यास दीर्घकाळ ओलावा टिकतो आणि ओठ सुंदर राहतात. रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास सकाळी ओठ अधिक मऊ आणि निरोगी दिसतात. रासायनिक लिप बामऐवजी तूप हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.
२. दूध आणि हळद एकत्र करुन तो पॅक जसा चेहऱ्याला लावता तसाच ओठांनाही लावता येतो. त्यामुळे काळवंडलेले ओठ सुंदर होतात. दुधामुळे पोत सुधारतो आणि हळदीमुळे रंग सुधारतो. दूध आणि हळद ओठांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. दुधातील लॅक्टिक अॅसिड मृत त्वचा काढून टाकते आणि ओठांना नैसर्गिक मऊपणा देते. हळदीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म ओठांवरील जखमा, दातांनी चावल्यामुळे झालेली इजा बऱ्या करण्यात मदत करतात.
३. ओठांवर अनेकदा डेडस्किनचा थर जमा होतो. त्यामुळे ओठ फुटतात आणि झोंबतातही. हाताने ओढून ही त्वचा काढायची आणि दातांनी चावायची अनेकांना सवय असते. मात्र तसे न करता खोबरेल तेलाचे मालीश करणे फायद्याचे ठरते. मृत-त्वचा आरामात निघून जाते आणि ओठांना मऊपणा मिळतो. तसेच झोंबतही नाही.
४. ओठांसाठी विकतचे रासायनिक स्क्रब वापरता? अजिबात वापरु नका. स्वयंपाकघरात असणारा एक पदार्थ त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करतो. साखर आणि मध असा पॅक तयार करायचा आणि तो ओठांना चोळायचा. दोन मिनिटे चोळा आणि मग धुऊन टाका. ओठ मस्त स्वच्छ होतात. दिसतातही सुंदर.
५. ओठांसाठी सगळ्यात मस्त ठरणारी गोष्ट म्हणजे गुलाबपाणी. कापसाच्या बोळ्यावर थोडे गुलाबपाणी घ्यायचे. तो बोळा ओठांवर फिरवायचा. असे केल्याने ओठ मऊ राहतात. तसेच ओठांना छान गुलाबी रंग येतो.