रंगपंचमीच्या सणाचा उत्साह काही वेगळाच असतो. कारण या दिवशी एकमेकांना भरपूर रंग लावून रंगवलं जातं. पाण्यात मनसोक्त खेळत रंगांची उधळण केली जाते आणि त्यानिमित्ताने कित्येकजण त्यांचे टेन्शन्स, ताण विसरून रंगात रंगून जातात. पण रंग खेळून झाल्यानंतर जेव्हा अंगाला लागलेला रंग धुण्याची वेळ येते, तेव्हा मात्र खूप पंचाईत होते. कारण अंगाला चिकटलेला रंग निघता निघत नाही. यामुळे मग कित्येकांना जळजळ होते. रॅशेस येतात. म्हणूनच रंग खेळायला जाण्यापुर्वी आणि रंग खेळतानाही काही गोष्टींची काळजी घेतली तर अंगावर जास्त रंग चिकटून राहणार नाही.(how to protect skin while playing holi colours?)
रंगपंचमीला रंग खेळताना त्वचेची कशी काळजी घ्यावी?
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रंग खेळायला जाण्यापुर्वी तुमच्या चेहऱ्याला भरपूर मॉईश्चरायजर लावा आणि सगळ्या अंगाला बॉडी लोशन लावून घ्या. यामुळे कोणताही रंग थेट तुमच्या त्वचेला लागत नाही. बॉडी लोशन आणि मॉईश्चरायजर नेहमीपेक्षा थोडं जास्तच लावावं.
रोपांची पानं पिवळी पडली- फुलंही येईना? चटकन १ कांदा चिरा आणि 'हा' उपाय करा- रोपं होतील टवटवीत
२. यानंतर त्वचेवर तेलाचा दुसरा एक थर द्या. यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. मॉईश्चरायजर आणि बाॅडी लोशन लावल्यानंतर सगळ्या त्वचेला व्यवस्थित तेल लावून घ्या. तेलामुळे तुमच्या त्वचेला जास्त संरक्षण मिळेल.
३. रंग खेळायला जाण्यापुर्वी सनस्क्रिन लावायला विसरू नका. कारण रंग आणि ऊन यामुळे त्वचेचं जास्तच नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सनस्क्रिन खूप गरजेचं आहे.
४. रंग खेळल्यानंतर अधूनमधून सारखा चेहरा धुवा. अंग धुवा. यामुळे त्वचेवर लागलेला रंग लगेच निघून जाईल. नंतर रंग काढायला जास्त त्रास होणार नाही..
Web Summary : Protect your skin this Holi! Apply moisturizer, coconut oil, and sunscreen before playing. Wash your face and body frequently during Holi to remove colors easily. This prevents skin irritation and rashes.
Web Summary : इस होली अपनी त्वचा को सुरक्षित रखें! खेलने से पहले मॉइस्चराइजर, नारियल तेल और सनस्क्रीन लगाएं। रंग आसानी से हटाने के लिए होली के दौरान बार-बार अपना चेहरा और शरीर धोएं। इससे त्वचा में जलन और चकत्ते नहीं होंगे।