Join us

चेहऱ्यावर टॅनिंग? १ कप तांदूळाच्या पाण्यात १ पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावा, चमकेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:29 IST

2 Ingredient Rice Toner For Glowing Skin : राईस वॉटर टोनर कसं बनवायचं ते पाहूया, त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कोरियन प्रोडक्टस उपलब्ध आहे (Skin Care Tips). ग्लास स्किन मिळवण्यासाठी महिला ही उत्पादनं लावतात. खासकरून राईस वॉटर टोनरचा वापर केला जातो. जेणेकरून त्वचा उजळ होईल. बाजारातून महागडे टोनर विकत घेण्यापेक्षा तुम्ही राईस टोनरचा वापर करू शकता. राईस वॉटर टोनर कसं बनवायचं ते पाहूया, त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. (2 Ingredient Rice Toner For Glowing Skin)

1) राईस टोनर कसे बनवावे

घरात राईस वॉटर बनवण्यासाठी तुम्हाला फक्त २ पदार्थांची आवश्यकता असेल ते म्हणजे १ कप तांदूळ आणि एक चतृथांश कप पाणी. टोनर बनवण्याची पहिली पद्धत म्हणजे पाण्यात तांदूळ घालून भिजवायला ठेवा नंतर अर्ध्या तासासाठी तसंच भिजवून राहू द्या नंतर गाळून तांदूळ वेगळे करा.  तयार पाणी तुम्ही चेहऱ्यावर टोनरप्रमाणे लावू शकता.  

तांदूळाचं टोनर बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे तांदूळाचं पाणी उकळवून घ्या.  जेव्हा पाणी उकळेल तेव्हा थंड होण्यासाठी ठेवा. हे पाणी चेहऱ्याला कापसाच्या मदतीनं लावा. नंतर स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि चेहरा स्वच्छ  करा.

2) राईस टोनरचे फायदे

राईस टोनर चेहऱ्यावर तुम्ही रात्रभर लावून ठेवू  शकता. ज्यामुळे त्वचेवर दिसणारे एजिंग  साईन्स कमी  होईल. चेहऱ्यावर डेड स्किन सेल्स येणार नाहीत. डाग कमी होईल आणि त्वचेवर ग्लो येईल. एक्ने कमी करण्यासाठी राईस टोनर एक इफेक्टिव्ह उपाय आहे. ज्यामुळे त्वचेवर दिसणारे पिंपल्स कमी होतात. ओपन पोर्सची समस्या या टोनरमुळे कमी होते. त्वचेवर दाणे येत नाही.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी