उन्हाळा सुरू झाला की त्वचेवर घाम, तेलकटपणा, जळजळ आणि टॅनिंग यांसारख्या समस्या वाढू लागतात. त्यावर अनेक उपाय आपण करतो. घरीच अनेक प्रकारे त्वचेची काळजी घेता येते. असे अनेक पदार्थ आणि गोष्टी आहेत ज्या त्वचेसाठी औषधी आहेत आणि सहज घरातच उपलब्ध होतात. ( 1 teaspoon of rose water will do the magic, see how to use )अनेक उपायांपैकी एक म्हणजे गुलाब पाणी. त्वचेची जळजळ होते किंवा आग होते अशा वेळी नैसर्गिक आणि सौम्य उपाय म्हणून गुलाब पाणी (Rose Water) खूप उपयोगी ठरते. घरच्या घरी सहज वापरता येणारे हे द्रव केवळ त्वचेसाठीच नव्हे तर डोळे, केस आणि मन शांत ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात गुलाब पाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचा थंडावा देणारा गुणधर्म. चेहऱ्यावर गुलाब पाणी स्प्रे केल्यास लगेच ताजेतवाने वाटते आणि त्वचेची जळजळ कमी होते. उन्हामुळे आलेला लालसरपणा कमी करण्यासाठीही हे खूप उपयुक्त आहे. गुलाब पाणी हे उत्तम नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. ते त्वचेचे छिद्र (pores) स्वच्छ करते, त्वचा घट्ट ठेवते आणि अतिरिक्त तेल नियंत्रित करते. त्यामुळे पिंपल्स आणि ऑयली स्किनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात डोळ्यांना जळजळ किंवा थकवा जाणवत असेल तर कापसात गुलाब पाणी घेऊन डोळ्यांवर ठेवले तर डोळ्यांना थंडावा आणि आराम मिळतो. संगणक किंवा मोबाइलचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी हा सोपा उपाय खूप उपयोगी ठरतो. गुलाब पाणी फेसपॅक किंवा उटणामध्ये मिसळून वापरता येते. चंदन, साय, बेसन किंवा मुलतानी मातीसोबत गुलाब पाणी वापरल्यास त्वचा मऊ, स्वच्छ आणि उजळ दिसते. यामुळे उन्हामुळे आलेला काळेपणा कमी होण्यास मदत होते.
तसेच, केसांसाठीही गुलाब पाणी फायदेशीर आहे. स्काल्पवर हलक्या हाताने लावल्यास खाज कमी होते आणि ताजेपणा जाणवतो. हे केसांना सौम्य सुगंधही देते. मन शांत ठेवण्यासाठी गुलाब पाण्याचा सुगंध खूप उपयोगी ठरतो. चेहऱ्यावर स्प्रे केल्यावर किंवा रूम फ्रेशनर म्हणून वापरल्यास तणाव कमी होतो आणि फ्रेश वाटते.एकंदरीत, गुलाब पाणी हा उन्हाळ्यातील एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. नियमित वापर केल्यास त्वचा निरोगी, ताजीतवानी आणि नैसर्गिकरीत्या सुंदर राहते.
Web Summary : Rose water cools, tones, and refreshes skin, combating summer issues. It reduces irritation, cleanses pores, and controls oil. Also soothes eyes, benefits hair, and calms the mind, promoting overall well-being.
Web Summary : गुलाब जल त्वचा को ठंडक देता है, टोन करता है और ताज़ा करता है, गर्मियों की समस्याओं से लड़ता है। यह जलन को कम करता है, छिद्रों को साफ करता है और तेल को नियंत्रित करता है। यह आंखों को आराम देता है, बालों को फायदा पहुंचाता है और मन को शांत करता है, जिससे समग्र कल्याण को बढ़ावा मिलता है।