Anushka, Virat, Gavaskar's comment and 'she' in our mind, whom we blame alwas, why | अनुष्का, विराट, गावसकरांची कमेंट आणि आपल्या मनातली ‘ती’

अनुष्का, विराट, गावसकरांची कमेंट आणि आपल्या मनातली ‘ती’

ठळक मुद्दे.तिच्यापायी झालं!

- अनन्या भारद्वाज

विषय सुरू होता, लॉकडाऊनमुळे प्रदीर्घ काळ बॅट्समनना बॉलिंग प्रॅक्टिस न मिळाल्याचा. एरव्ही आयपीएलसह कोणतीही मोठी स्पर्धा असली की हल्ली खेळाडू किती सराव करतात, प्रत्यक्ष मैदानात सरावासह स्वत:च्या आणि प्रतिस्पध्र्याच्या तांत्रिक चुका शोधून त्यावरही काम करतात. सराव करतात. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंटेटर आकाश चोप्रा आणि सुनील गावसकर याच विषयावर बोलत होते. कोहली-धोनीसारख्या खेळाडूंनाही सरावाची उणीव जाणवतेय असा चर्चेचा सूर होता. त्यावेळी गावसकर म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात विराटने फक्त अनुष्काच्या बॉलिंगचा सराव केला, त्याचा काय उपयोग?’
-संदर्भ होता, लॉकडाऊनकाळात विराट-अनुष्का राहत्या इमारतीत क्रिकेट खेळत होते, कुणीतरी तो व्हिडिओ शूट केला आणि व्हायरल झाला. गावसकरांच्या  या सहज कमेण्टवर आकाश चोप्रा म्हणालाही की, सेलिब्रिटींना खासगी आयुष्य उरलेलंच नाही, लोक त्यांचे खासगी क्षणही शूट करतात.
मॅच पाहणा:या अनेकांनी ही चर्चा ऐकली, गावसकरांची कमेंटही ऐकली. त्यावरून मोठा गदारोळ झाला. गावसकरांनी ‘सेक्सिस्ट’ टिप्पणी केली, अनुष्काला टोमणा मारला असं म्हणत सोशल मीडियात दंगल झाली. विशेष म्हणजे एरव्ही कधीही अशा चर्चेत न पडणा:या अनुष्कानेही सोशल मीडियात पोस्ट लिहून थेट विचारलंच गावसकरांना, ‘माझा संबंध काय? मैदानावरच्या विराटच्या कामगिरीचं खापर माङयावर का फोडता?’


यापूर्वीही विराटचा फॉर्म गेला तेव्हा अनुष्का त्याच्यासाठी ‘अनलकी’ आहे. तिचा पायगुण बरा नाही, ती स्टेडियममध्ये मॅच पहायला आली की त्याचा फॉर्म जातो अशा शेकडो टिप्पण्या झाल्या आहेत. सोशल मीडियात वाह्यात कमेंट, ट्रोलिंगही झालं आहे. अगदी विराट कोहलीनेही जाहीरपणो सांगितलं की, जरा आवरा, माङया अपयशाचं खापर तिच्यावर फोडू नका. तिचा या सा:याशी काहीच संबंध नाही. अर्थात म्हणून काही ती टीका थांबली नाहीच. अनुष्काच्या गरोदरपणाची बातमी जाहीर झाल्यावरही वाह्यात ट्रोलिंग झालं होतंच. 
यावेळी मात्र अत्यंत सन्माननीय महान खेळाडू, अतिशय संयत कॉमेंटेटर असलेल्या गावसकरांनी ‘अशी’ कमेंट केली त्यामुळे अनेकांना धक्का बसला. अर्थात त्यावर गावसकरांनी खुलासा केला की, माझं विधान संदर्भ सोडून वापरलं गेलं, अर्थाचा अनर्थ केला गेला. मी केवळ त्या व्हायरल व्हिडिओ आणि सरावाची गरज यासंदर्भात बोलत होतो. - तरीही चर्चेची वारुळं फुटली. अनुष्काचे चाहते-गावसकरांचे चाहते यांच्यात दंगल झाली. 
भावना दुखावल्या गेल्या. आरोप -प्रत्यारोप झालेच. मात्र यात एक बाजू अशी होती की त्यांचं म्हणणंच होतं की ते विधान ‘सेक्सिस्ट’ अर्थात लिंगभेदीच होतं. अत्यंत सहज केलेली ही कमेंट गैर आहे, अनाठायी आहे. एका महिलेचा सन्मान न राखणारी आहे  आणि  अशी अस्थानी टिप्पणी झाली याचंही अनेकांना सखेद आश्चर्य वाटलं. राग आला.
हे सारं इथवर असं येऊन पोहोचलं. 
आता तो विषय मिटलाही आहे. 


 मात्र या सा:यात एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की, एरव्हीही आपल्याकडे बायकांना दोष देणं, त्यांच्यावर विनोद करणं, त्यांना कमी वा मूर्ख लेखणं,  हे समाजमाध्यमातील विनोदातही सर्रास घडतं. कुणाचा नवरा वा मुलगा उत्तम कामगिरी करत असेल तर त्याचं श्रेय त्याच्या आईला, पत्नीला, मैत्रिणीला सहजी दिलं जात नाही. कुणी असं म्हणत नाही की, तिच्यामुळे तो असा भन्नाट कामगिरी करतो, कर्तृत्व करतो. त्याचं जे काही यश असतं, ते निर्विवाद त्याचंच असतं. मात्र त्याच्या अपयशाचं खापर शंभर टक्के त्याच्या सोबतिणीच्या किंवा आईच्या नावे फोडलं जातं. 
‘तिच्या नादी लागला आणि बिघडला!’, ‘ तिचं लक्ष नाही त्याच्या तब्येतीकडे, त्याच्याकडे!’

‘तिचं लक्ष नाही घराकडे, तिनं काळजी घेतली नाही!’, ‘ तिनं नको होते का संस्कार करायला!’,

‘तिनं त्याला घरच्या जबाबदा:यात अडकवायला नको होतं!’

‘तिनं कशाला आपलं तोंड उघडायचं, तिच्यामुळे त्याचं करिअर धोक्यात आहे.’

‘ती त्याच्या इमेजची वाट लावणार!’ ‘तिच्यामुळे त्याचं करिअर खड्डय़ात जाईल एक दिवस!’,

‘ तिनं त्याचं माकड केलं!’
- हे ‘तिला’ दोष देणं किती सहजी घडतं. आणि ते पुरुषच करतात असं नाही तर बायकाही सर्रास करतात. एका सज्ञान पुरुषाच्या अपयशाचं सारं खापर तिच्या डोक्यावर फोडणं आणि त्याला अगदीच काही कळत नाही, तो तिच्यापायी वाहवत गेला असं म्हणणं हे त्या स्री-पुरुष दोघांवरही अन्यायकारक नाही का? 
अनुष्का-विराट आणि गावसकर यांच्या निमित्तानं हे प्रश्न आपण स्वत:ला विचारले पाहिजेत. 
सोशल मीडियात वाद घालणं सोपं आहे, मात्र आपल्या मनातही खोल रुतलेले हे लिंगभेदी समज आपण कधी पुसणार? पुढच्या वेळी कुणा तिला दोष देत जजमेंटल होताना किमान तारतम्यानं लिंगभाव वजा विचार करणार का?

-विचारू स्वत:ला.


( लेखिका मुक्त  पत्रकार आहेत.)

Web Title: Anushka, Virat, Gavaskar's comment and 'she' in our mind, whom we blame alwas, why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.