11,60,000,00 babies will be born .. what for their safety? | 11,60,000,00 बाळं जन्माला येणार आहेत.. त्यांच्या सुरेक्षेसाठी काय?

11,60,000,00 बाळं जन्माला येणार आहेत.. त्यांच्या सुरेक्षेसाठी काय?

मुलाखती आणि संकलन : माधुरी पेठकर


जगभर कोरोना महामारीचं संकट गडद आहे. जगभरात अनेक देश लॉकडाऊन आणि कफ्यरुचा अनुभव घेत आहेत. रस्ते बंद, सार्वजनिक आणि खाजगी वाहतुक बंद, दुकानं बंद. आवश्यक साधनसामुग्रीचा तुटवडा, सर्वच क्षेत्रत आवश्यक आणि पुरेशा मनुष्यबळाची    कमतरता ..अशा अवघड परिस्थितीत एका काळजीच्या मुद्याकडे  ‘युनिसेफ’ या जागतिक संघटनेनं अवघ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. 
 युनिसेफनं पोटतिडकीनं मांडलेला काळजीचा मुद्दा म्हणजे कोरोना संकटाच्या गडद छायेत जगभरात 11 कोटी 60 लाख बालक ंजन्माला येणार आहेत.   या नवजात बालकांचं आनंदानं स्वागत होण्याची , त्यांना सुरक्षिततेची हमी मिळण्याची खात्री नाही . ही अतिशय संवेदनशील बाब असून शासनानं आणि व्यवस्थेनं त्यात लक्ष घालण्याची गरज असल्याचं युनिसेफ  सांगत आहे. 
घरात बाळ  जन्माला येणार म्हटल्यावर अवघं घर आनंदून जातं. सतर्क होतं. गर्भावस्थेचे नऊ महिने, बाळ जन्माला आल्यानंतरचे काही महिने हा असा कालखंड असतो की कधीही तातडीनं दवाखान्याची, डॉक्टरांची, आरोग्य कर्मचा:यांची गरज भासते. त्यासाठीची आवश्यक धावपळ  करण्यासाठी संपूर्ण घर जागरूक असतं. पण आज आपल्याच देशात नाही तर जगभरात परिस्थिती अशी आहे की तातडीच्या वेळेस आईला , नवजात बाळाला हवी ती मदत मिळेलच याची अजिबात खात्री नाही. आणि युनिसेफला काळजी वाटतेय ती नेमकी याचीच. 
मार्चपासून जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे.  कोरोनाशिवायच्या इतर रूग्णांसाठी आरोग्यविषयक आणीबाणी निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आई होणा-या स्त्रिया तर जास्तच हवालदिल झाल्या आहेत.  कोरोनामुळे गर्भावस्थेतल्या नियमित तपासण्या, प्रसूतीनंतरच्या तपासण्या, बाळाचं लसीकरण यासारख्या नियमित आणि अत्यावश्यक बाबींचं वेळापत्रकंच मार्चपासून जगभरात विस्कळीत झालंय. कोरोनाच्या संसर्गाच्या दहशतीनं अनेक गर्भवती महिला नियमित तपासण्यांसाठी दवाखान्यात जायला घाबरत आहेत, आपण आणि आपलं बाळ सुरक्षित राहू ना या काळजीने अनेकींनी घरीच प्रसूतीचा मार्ग स्वीकारण्याची तयारी चालवली आहे. हीच परिस्थिती जर कायम राहिली, जबाबदार व्यवस्थेनं यात जर हस्तक्षेप केला नाही तर कोविड 19 चा मोठा परिणाम  मातांवर आणि त्यांच्या बाळांवर झाल्याशिवाय राहणार नाही. 
आज अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातही गर्भवती महिला आणि जन्माला येणा-या  बाळांसाठी कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेतही येत्या 16 डिसेंबर्पयत 33 लाख बालकेजन्माला येणार आहेत. न्यू यॉर्कमधील शासकीय व्यवस्थेनं प्रसूतीसाठी पर्यायी  व्यवस्था उभी करायला सुरूवात केली आहे. कारण अमेरिकेतल्या बहुतांश स्त्रिया नेहेमीच्या दवाखान्यात प्रसूती करण्याबाबत सांशक आहेत. 
या  पार्श्व भूमीवर गरोदर स्त्रिया, माता,  बालकं यांच्या सुरक्षेच्या काळजीनं युनिसेफनं  आवश्यक उपाययोजनाही सांगितल्या आहेत.  युनिसेफ च्या मतानुसार  कोरोनाचा धोका इतर सामान्य महिलांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांना कमी आहे हे दाखवणारे पुरावे आहेत. ही जमेची बाजू पण  गर्भवती स्त्रियांच्या नियमित तपासण्या, औषधोपचार, प्रसूती, प्रसूती पश्चातच्या सेवा, नवजात बालकास आवश्यक असल्यास तातडीच्या सेवा पुरवल्या जातील, बाळाचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नवीन मातांना स्तनपान कसं करावं याचं मार्गदर्शन , वेळच्यावेळी औषधोपचार, लसीकरण आणि पोषणासंबंधीचं मार्गदर्शन गरजू स्त्रियांना मिळेल याची व्यवस्था शासनानं तातडीनं करायला हवी. म्हणूनच  प्रत्येक देशातील सरकारला ,तेथील आरोग्य व्यवस्थेला गरोदर मातांच्या आणि जन्माला येणा-या बाळांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूरक व्यवस्था उभारण्याचं आवाहन युनिसेफनं केलं आहे. 
आज कोरोनाच्या काळात जगभरातील लोकांना, देशांना एकजुटीच्या प्रयत्नांच आवाहन केलं जात आहे. ही एकजूट  गर्भवती महिला माता आणि नवजात अर्भक यांच्या आरोग्याची काळजी घेतांनाही दाखवायला हवी. यासाठी आवश्यक आधार आणि व्यवस्था जगभरात उभी राहायला हवी!
----------------------------------------------------------

 

देशांच्या आरोग्य-यंत्रणांसाठी युनिसेफच्या मार्गदर्शक सूचना
बाळ आणि आईकडे लक्ष द्या!

  * गरोदर स्त्रियांना प्रसूतीपूर्व आवश्यक चाचण्यांसाठी मार्गदर्शन करा. 
 * कोरोनच्या भीतीनं प्रसूती घरी न करता दवाखान्यातच , तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यासाठी  आग्रह करा. त्यांना त्यासाठी आश्वासित करा.
  * प्रसूतीनंतर माता आणि नवजात बालकाची देखभाल, कोरोना संदर्भातील तपासण्या आणि उपचाराची योग्य ती व्यवस्था करा. 
  * सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक  यांना कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर स्वसंरक्षणाचं साहित्य मिळेल याची तरतूद करा. दरम्यान कोविडची लस उपलब्ध झाल्यास आधी या आरोग्यकर्मचा:यांना देण्याची व्यवस्था करा. यामुळे हे आरोग्य कर्मचारी प्रसूतीदरम्यान सुरक्षित आणि उत्तम प्रकारची सेवा गर्भवती स्त्रियांना आणि नवजात बालकांना देऊ शकतील. 
  * ज्या आरोग्य केंद्रात, दवाखान्यात प्रसूतीची सोय आहे ती जागा सुरक्षित आणि निजरुंतक केली आहे याची खात्री द्या.
  * दुर्गम भागात राहणा-या   गर्भवती स्त्रिया , माता यांच्यार्पयत पोहोचण्याची परवानगी आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना द्या. 
  * आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना कोरोनाच्या पार्श्व भूमीवर प्रसूतीद्रम्यान काय विशेष काळजी घ्यावी, नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी यासाठीचं योग्य प्रशिक्षण द्या. कोरोनाच्या तीव्र प्रादुर्भावामुळे जेथील आरोग्यव्यवस्था गरोदर महिलांसाठी उपलब्ध होऊ शकणर नाहीत तेथील महिलांची प्रसूती घरी करण्यासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा त्यांच्याकडे असावा.
-----------------------------------------------------

गर्भवती महिलांसाठी युनिसेफच्या मार्गदर्शक सूचना
घाबरू नका पण काळजी घ्या!

*  आपल्यामधे कोरोनाची काही लक्षण तर नाही ना याकडे प्रत्येक गरोदर महिलेनं बारकाईनं लक्ष ठेवावं. 
*  इतर सामान्य माणसांप्रमाणोच कोरोनाचा संसर्ग  होऊ नये म्हणून गरोदर महिलांनी सुरक्षित शारीर अंतर बाळगावं. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. *  गरोदर स्त्रीनं भिती वाटत असल्यास सुईण किंवा डॉक्टर यांच्यासोबत बोलावं. बाळाला कुठे जन्म देणं सुरक्षित वाटतं ते सांगावं. आणि प्रसूतीच्या वेळेस संबंधित तिथे असतील याची खात्री करून घ्यावी. 
 *  माता ही कोरोनाबाधित असली किंवा कोरोना संशयित असली तरी  ती बाळाला स्तनपान करू शकते.  मातेच्या दुधात कोरोना विषाणू आढळलेला नाही. त्यामुळे मातेनं बाळाला दूध पाजणं सुरक्षित आहे. फक्त कोरोनाबाधित महिलेनं बाळाला दूध पाजताना  तोंडाला मास्क लावावा.  बाळाला घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर साबणानं हात स्वच्छ धुवावेत. 
 * बाळाच्या जन्मानंतरचं लसीकरण आणि औषधोपाचारासाठी नियमित दवाखान्याशी संपर्क ठेवावा. 
-----------------------------------------------------------

काळ कठीण आहे, तो का?
युनिसेफ कोरोनाच्या पार्श्व भूमीवर गर्भवती महिला, माता आणि बालक यांच्यासाठी काळ कठीण आहे असा इशारा दिला आहे, या इशा-याचा अर्थ सामान्य लोकांनी आणि व्यवस्थेनंही समजून घ्यायला हवा. उद्योगधंदे बंद झाल्याने रानोमाळ झालेले आपल्या देशातले मजूर त्यांच्या कुटुंबकबिल्यासह घराच्यादिशेनंमैलोनमैलचालत आहेत.  त्यातील कितीतरी महिला गर्भवती आहेत, आणि तरीही त्या जीवाच्या जोखमीचा विचार न करता चालत आहेत. या अवस्थेत त्यांना आवश्यक  पोषण मिळणं सोडाच, साधं दोन वेळेसचं जेवणही मिळत नाहीये. या ग्र्भवती आइसाठी, तिच्या बाळासाठी   हा काळ कठीण आहे तो यासाठी.
आज भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी एक  तृतियांश नागरिकआर्थिक असुरक्षिततेचा सामना करत आहेत.  देशातील एकूण  90 टक्के कर्मचारी, मजूर हे असंघटित क्षेत्रत काम करतात, यातल्या बहुतेकांचा रोजगार गेला आहे. कमावण्याचं साधनच हातात न उरलेल्या या कामगारांच्या घरातल्या गर्भवती, नवजात माता-बालकांची अक्षम्य हेळसांड अपरिहार्य आहे. रोजगार हरवल्याने शहरांकडून गावाकडे निघालेली ही माणसं गावात जाऊनही उपाशीच राहणार आहेत. ही परिस्थिती महिला आणि मुलांसाठी सर्वात धोकादायक आहे. कारण गर्भवती महिलांना, मातांना, त्यांच्या मुलांना पोषक आहार मिळणार नाही. वाढीच्या वयातल्या मुलांची वाढ खुंटेल.  त्याचा शारीरिक आणि बौध्दिक विकासावर परिणाम होईल. मुलींची वाढ खुंटली तर त्या  मोठ्या होऊन बाळाला जन्म देतील तेव्हा ते बाळही कुपोषितच जन्माला येईल. हे कुपोषणाचं चक्र असंच सुरू राहिल. या कटीण काळाचा सामना करणं या लोकांना सोपं जावं म्हणून युनिसेफ सरकारी व्यवस्थांना नियमित सेवा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. या काळात गरीब आणि गरजूंना आर्थिक लाभ देण्याच्या, त्यांच्या बॅंक खात्यात थेट पैसेजमा करण्याच्या, त्यांना रेशनचं धान्य पुरवण्याच्या, आरोग्य सेवा देण्याच्या सेवा खंडित होता कामा नयेत. तुमच्याकडे अमूक एक  कार्ड नाही, अमूक एक कागदपत्र नाही म्हणून तुम्हाला अमूक एक सुविधा, धान्य मिळणार नाही अशा अटी या अडलेल्या लोकांसमोर ठेवू नयेत असं आवाहनही युनिसेफनं शासनाला केलं आहे.

-डॉ. खनिंद्र भुयान
आरोग्य तज्ज्ञ ज्ञ, युनिसेफ , महाराष्ट्र


 

Web Title: 11,60,000,00 babies will be born .. what for their safety?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.