राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचं प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 06:43 PM2017-12-28T18:43:36+5:302017-12-28T18:50:06+5:30

वरळीतील नेहरु सेंटर आर्ट गॅलरीमध्ये राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे

राजा रवी वर्माच्या यांच्या चित्रांचा पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.

राजा रवी वर्मा हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली.

राजा रवी वर्मा यांनी काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत ते समजले.

भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रवि वर्मा यांनी काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात.

1873 मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रवि वर्मा यांनी सुवर्णपदक मिळवले होते.