प्रोपिलीन गळतीचा थरार: ड्रायव्हरचे दोन्ही हात भाजले, पण पेरूच्या झाडाच्या खुट्टीने वाचवला हजारो लोकांचा जीव; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:07 IST2026-02-11T11:27:53+5:302026-02-11T12:07:55+5:30

मागील काही दिवसापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेवेवर एक केमिकलचा टँकर पलटी झाला होता. यामुळे तब्बल ३२ तास ट्राफिक जाम झाले होते.

मागील काही दिवसापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन वायूचा टँकर उलटल्यामुळे अपघात झाला होता. प्रोपिलीन हे केमिकल खूप धोकादायक आहे. या केमिकलमुळे मोठा अनर्थ घडला असता पण ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

या अपघातामुळे जवळ जवळ ३२ तास एक्स्प्रेस वेवरील वाहतूक थांबली होती. यामध्ये अनेक गाड्या अडकल्या होत्या. या प्रकरणावरून टीकाही झाल्या आहेत. पण, या वायूचा अनेकांना धोका झाला असता. वेळीच पेरुच्या झाडाच्या फांदीची खुट्टी बनवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

टँकर अपघातानंतर प्रोपोलिन वायूगळती होत असताना एका “पेरू”च्या झाडापासून बनवलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचवला. उच्च दाबाखाली द्रवरूपात वाहणारा प्रोपिलीन दाब कमी होताच वेगाने बाहेर पडतो आणि तापमान –२० ते –२३ अंशांपर्यंत घसरते. त्यामुळे वायू गळतीच्या ठिकाणी बर्फ साचतो. हा बर्फ हाताला लागला तर जणू आग लागल्यासारखी जखम होते. सुरुवातीला टँकर ड्रायव्हरने त्या ठिकाणी हात लावल्यामुळे त्याचे हात भाजले होते. यावेळी चालकाची एक चूक त्याच्या जीवावर बेतली असती.

ज्यावेळी या वायूची गळती झाली होती त्यावेळी जर परिसरात एखादी ज्वलनशील वस्तू असती तर मोठा स्फोट झाला असता तर १० किलोमीटर अंतरापर्यंत मोठे नुकसान झाले असते. हे अनेकांच्या जीवावर बेतले असते.

त्या टँकरमध्ये २२ टन प्रोपोलिन वायू होता. हा वायू इतका घातक होता की, त्याचा वास येत नाही, मात्र कालांतराने तो शरीरात भिनला की श्वास रोखतो आणि ज्वलनशील गोष्टींच्या संपर्कात आल्यास पेट घेतो. या वायूमुळे मोठे नुकसान झाले असते.

वेळीच प्रशासनाने अपघातग्रस्त टँकरच्या एक किलोमीटर मागे गाड्या थांबवल्या. मदतकार्य सुरू केले. यावेळी एक चुकीचे पाऊल अनेकांच्या जीवावर बेतले असते.

अपघातात टँकरचा मेन व्हॉल्व तुटला होता. यामुळे वायू गळती जोरात सुरू होती. ही वायू गळती रोखण्यासाठी तज्ञांनी पेरूच्या झाडाची खुट्टी बनवून ती गळती नियंत्रणात आणली. ३६ तास हे ऑपरेशन सुरु होते. ही वायू गळती रोखण्यासाठी पेरूच्या झाडाचीच खुट्टी का बनवण्यात आली कारण, पेरूचे लाकूड मऊ व लवचिक असल्याने थंडीत फुगते आणि घट्ट घुसल्याने ती फुगते यामुळे घट्ट बसते.

अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणाहून काही अंतरावरून पेट्रोल कंपन्यांच्याही लाईन गेल्या होत्या. वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी टँकर हलवण्यासाठी टॅकरमधील वायूचे वजन कमी करणे आवश्यक होते.

तीन टप्प्यांमध्ये अपघातग्रस्त टँकरमधील वायू ट्रान्सफर करण्यात आला. या प्रक्रियेला तब्बल ३२ तास लागले पण, कोणतेही नुकसान न होता ही प्रक्रिया करण्यात आला. यामुळे मोठा अपघात टळला.