Dhananjay Munde: धनंजय मुंडेंसोबतची प्रेमकथा एका पुस्तकातून उलगडणार; करुणा मुंडेंच्या पोस्टमुळे पुन्हा खळबळ

Published: May 14, 2021 07:55 AM2021-05-14T07:55:57+5:302021-05-14T08:15:50+5:30

करुणा धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) या नावाने फेसबुक अकाऊंट असलेल्या पेज वरून त्यांच्यातील प्रेम कथेचे रहस्य उलगडणार असल्याचे सांगितले गेले आहे.

एका तरुणीने केलेल्या अत्याचाराच्या खळबळजनक आरोपानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (NCP Leader Dhananjay Munde) यांनी खुलासा करत दुसऱ्या लग्नाबाबत जगजाहीर केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजल्याचे दिसून आले होते.

याचदरम्यन, धनंजय मुंडे यांच्या खुलाशानंतर चर्चेत आलेली त्यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे आपल्या प्रेमकथेचे रहस्य एका पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या नात्यासंबंधीच्या चर्चेला उधाण आले आहे.

करुणा धनंजय मुंडे या नावाने फेसबुक अकाऊंट असलेल्या पेज वरून त्यांच्यातील प्रेम कथेचे रहस्य उलगडणार असल्याचे सांगितले गेले आहे. सोबतच एक फोटोही जोडण्यात आला आहे. तसेच माझ्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम जिवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर असुन त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता त्यावेळी स्वतः धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या बहिणीसोबत आपण परस्पर संबंधात होतो असा खुलासा केला होता. एवढेच नाही तर या महिलेपासून आपल्याला दोन मुलं असल्याचाही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट मधून खुलासा केला होता.

करुणा धनंजय मुंडे, असं त्या महिलेचं नाव असल्याची माहिती समोर आली. करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.

करुणा मुंडे यांच्या पोस्टचे स्क्रीनशाॉट मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र अद्याप धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

२००६ पासून चार-एक वर्ष सोडल्यास धनंजय मुंडेंनी माझा वापर केला. २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मला सांत्वना दाखवून, विश्वास देऊन केवळ माझा वापर करून घेतला. मला उद्ध्वस्त केलं. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला, असे खळबळजनक आरोप तक्रारदार महिलेनं केले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प का राहिलात, असा प्रश्न महिलेला विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते.

आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप महिलेने केला होता. मात्र काही दिवसांतच रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली होती.

धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत याबाबत खुलासा करताना म्हटले होते की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केलं होतं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!