अंधेरीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 15:52 IST2019-08-13T15:48:54+5:302019-08-13T15:52:25+5:30

कोल्हापूर, सांगली सातारा याठिकाणी आलेल्या पुरातून सावरण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. अंधेरीतील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली.

अंधेरी पूर्व येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरापासून ही मदत फेरी काढण्यात आली. यामध्ये समता परिषदेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते बबन मदने, दशरथ कुराडे यांच्या नेतृत्वात ही मदत फेरी काढण्यात आली.

यावेळी मंदिर परिसरात उपस्थित लोकांकडून तसेच लहानग्यांकडूनही पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात आला.