'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:06 IST
1 / 7मुंबईतील दादर भागात असलेल्या एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांवर अनेकवेळा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या शिक्षिकेला अटक करण्यात आली. शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत कार, हॉटेलमध्ये नेऊन संबंध ठेवल्याचे तपासातून समोर आले. 2 / 7शिक्षिकेला अटक करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयासमोर आल्यानंतर धक्कादायक खुलासा शिक्षिकेने केला. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत जबरदस्ती शरीर संबंध ठेवल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.3 / 7शिक्षिकेने न्यायालयाकडे केलेल्या जामीन अर्जात सांगितले की, 'विद्यार्थी माझ्या प्रेमात पडला होता आणि आमच्या दोघांमध्ये एकमेकांच्या संमतीने शरीरसंबंध होते.'4 / 7शिक्षिकेने याचा पुरावा म्हणून विद्यार्थ्याने तिला लिहिलेली प्रेमपत्र आणि मोबाईलवरून झालेल्या चॅटिंगच्या स्क्रिनशॉट न्यायालयासमोर सादर केले. शिक्षिकेने जामिनासाठी अर्ज केला आहे. 5 / 7शिक्षिकेने न्यायालयाकडे केलेल्या अर्जात म्हटले आहे की, 'मी आणि तो काही काळ प्रेमसंबंधांमध्ये होतो. तो मला पत्नी म्हणायचा. इतकंच काय तर तो प्रेमाने मला किकी आणि पुकी अशा नावाने हाक मारायचा.' याबद्दलचे चॅट्सही शिक्षिकेने सादर केले.6 / 7शिक्षिकेने न्यायालयात केलेला दावा आणि पुरावे यामुळे हे संपूर्ण प्रकरण फिरले आहे. कारण शिक्षिकेने विद्यार्थ्याला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला. त्यात शिक्षिका सुरुवातीला विद्यार्थ्याला कारमध्ये घेऊन जायची आणि निर्मनुष्य ठिकाणी त्याच्यावर अत्याचार करायची, असाही आरोप आहे.7 / 7शिक्षिकेने विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये नेले. तिथे त्याला दारू प्यायला देऊन त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याचेही पोलिसांनी सांगितले होते. पण, आता शिक्षिकेने दोघांमध्ये झालेले शरीरसंबंध एकमेकांच्या संमतीने होते असा दावा केला आहे.