'शालू'ची 'हॉट अँड ग्रीन' ब्युटी, हिरवळीतील फोटोंवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 02:38 PM2021-08-28T14:38:50+5:302021-08-28T14:49:51+5:30

राजेश्वरी खरात इंस्टाग्रामवरुन सातत्याने डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. त्या व्हिडिओला चाहतेही पसंत करतात. आता राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोवरही चाहते फिदा झाले आहेत.

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या फॅन्ड्री या चित्रपटात शालूच्या भूमिकेतून अभिनेत्री राजेश्वरी खरात नावारुपाला आली. तिने साकारलेली शालूची भूमिका रसिकांना चांगलीच भावली होती.

शालू म्हणजेच राजेश्वरी खरात खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सध्या ती तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. तिचे फॅन फॉलोव्हिंगदेखील जास्त आहे.

तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ती प्रेमात पडल्याचे सांगताना दिसली.

राजेश्वरी खरात इंस्टाग्रामवरुन सातत्याने डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. त्या व्हिडिओला चाहतेही पसंत करतात. आता राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोवरही चाहते फिदा झाले आहेत.

राजेश्वरीने झाडांच्या आजूबाजूला उभे राहून फोटोशूट केले आहे. या फोटोत ती कमालीचे सुंदर दिसते, त्यामुळेच चाहत्यांनी कमेंटमध्ये सो ब्युटीफूल असं म्हटलंय.

राजेश्वरीने सकाळी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये चाहत्यांना गुड मॉर्निंग असे तिने म्हटलंय. तिच्या या फोटोवरही चाहत्यांच्या भरपूर कमेंट आल्या आहेत.

फेसबुकवरुन तिने बगिचेमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोला पाहून काहींनी हिरवळ, झाडे लावा, झाडे जगवा... अशा कमेंट केल्या आहेत. या फोटो शालू सुंदर दिसते.

शालू नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रीयता दर्शवते. त्यामुळे चाहतेही तिचे नवनवीन फोटो पाहण्यासाठी आतुर असतात. तिच्या घायाळ अदांनी चाहत्यांची संख्या वाढली आहे.

राजेश्वरी खरातने नागराज मंजुळेच्या फॅन्ड्री या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातून तिला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने आयटमगिरी सिनेमात काम केला.

काही दिवसांपूर्वी तिचा आगामी चित्रपट रेडलाइटचे पोस्टर रिलीज झाले आहे. हा चित्रपट वैश्या व्यवसायावर आधारीत आहे. तिचे चाहते तिच्या या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.