मुंबईकरांनो सावधान! 'हे' ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये; कोरोनाला हलक्यात घेऊ नका

By मोरेश्वर येरम | Published: February 13, 2021 02:00 PM2021-02-13T14:00:30+5:302021-02-13T14:14:14+5:30

Mumbai Covid 19 Danger Zones : मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईतील कोणते ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये आहेत? जाणून घेऊयात...

मुंबईतील ९ विभागांमध्ये कोरोनाचे (Corona in Mumbai) सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. शहराच्या सरासरीपेक्षा मुंबईतील या विभागांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये ०.१३ टक्के वाढ झाली आहे.

मुंबईतील एफ उत्तर, एम पश्चिम, एल, आर मध्य, आर पश्चिम, पी उत्तर, के पश्चिम, टी आणि एस या विभागांमध्ये कोरोनाची अधिक रुग्णसंख्या आहे.

आश्चर्याचीबाब अशी की जास्त रुग्णसंख्या ही झोपडपट्टी नसलेल्या भागांतील आहे. यात पूर्व उपनगरामधील ५, पश्चिमेकडील ३ आणि मध्य मुंबईतील १ अशा प्रभागांचा समावेश आहे.

मुंबईतील मध्यवर्ती भागात असलेल्या टिळक नगर, घाटकोपर, कुर्ल्यातील नेहरु नगर, विक्रोळी आणि भांडूप परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, खार, अंधेरी आणि जोगेश्वर (पूर्व) येथेही कोरोना रुग्ण संख्या अधिक आहे.

लोकांची वाढलेली रहदारी, बाजारपेठा, लोकल सेवा, बस सेवा यांमध्ये वाढलेली गर्दी यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईतील ज्या प्रभागांमध्ये रुग्ण वाढ होत आहे तेथे ८० टक्के रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील असल्याचं सांगण्यात येत आहे.

चेंबूर आणि टिळक नगर येथे मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ होत असल्याचं दिसून येत आहे. येथील रुग्णवाढीचा दर सरासरी ०.२१ टक्के इतका आहे.

त्यानंतर एल वॉर्ड म्हणजेच कुर्ला परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दर ०.१७ टक्के इतका आहे.

मुंबईत रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून येत असल्यानं चिंता व्यक्त केलीय जातेय. पण नागरिकांनी घाबरुन न जाता जास्तीत जास्त काळजी घेणं आणि शासनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे.