‘बेस्ट’ बसखाली चिरडून तरुणीचा मृत्यू. चालकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 07:09 IST2020-07-16T07:09:00+5:302020-07-16T07:09:25+5:30

मुंबई : स्कूटरवरून पडून ‘ बेस्ट’च्या बसखाली आल्याने एका तरुणीला जीव गमवावा लागला. तिच्या भावासोबत ती डबलसीट जात होती. ...

Young woman crushed to death under 'BEST' bus | ‘बेस्ट’ बसखाली चिरडून तरुणीचा मृत्यू. चालकाविरोधात गुन्हा दाखल

‘बेस्ट’ बसखाली चिरडून तरुणीचा मृत्यू. चालकाविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : स्कूटरवरून पडून ‘बेस्ट’च्या बसखाली आल्याने एका तरुणीला जीव गमवावा लागला. तिच्या भावासोबत ती डबलसीट जात होती. मंगळवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली.
फैमिना शेख (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती गोरेगाव पश्चिमेच्या प्रेमनगर परिसरात राहते. मंगळवारी ती तिचा भाऊ दिलशाद (१९) याच्यासोबत काही कामानिमित्ताने जोगेश्वरीच्या दिशेने स्कूटरवरून निघाली होती. या ठिकाणी २४ कॅरेट सिनेमा परिसरात आल्यावर त्यांच्या समोरून जाणाऱ्या एका कारने अचानक वेग कमी केला. त्यामुळे स्कूटर घसरून त्यावर बसलेली फैमिना खाली पडली. त्याच वेळी तिच्या मागून भरधाव येणाºया बसने तिला चिरडले. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांना बसचालक के चेल्लदुरई कोई पिल्लई (५४) याला ताब्यात घेतले, तो बोरीवलीच्या बेस्ट वसाहतीत राहतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करून आम्ही त्याला अटक केल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली.

Web Title: Young woman crushed to death under 'BEST' bus

टॅग्स :BESTबेस्ट