'होय, संसदेतील क्लीप दाखवा"; आरक्षणावरुन मराठा बांधवांनी खासदार महोदयास घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 02:39 PM2024-03-11T14:39:47+5:302024-03-11T14:45:25+5:30

खासदार महोदय मतदारसंघात कार्यक्रमानिमित्त जात असताना, काही मराठा समाज बांधवांनी त्यांना मराठा आरक्षणाबद्दल जाब विचारला.

'Yes, show clips from Parliament'; The Maratha brothers surrounded the MP of solapur jai sidheshwar from the reservation of maratha | 'होय, संसदेतील क्लीप दाखवा"; आरक्षणावरुन मराठा बांधवांनी खासदार महोदयास घेरलं

'होय, संसदेतील क्लीप दाखवा"; आरक्षणावरुन मराठा बांधवांनी खासदार महोदयास घेरलं

मुंबई/सोलापूर - आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून लवकरच निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या घोषणेनंतर देशभरात आदर्श आचरसंहिता लागू होईल, त्यामुळे, नागरिकांना आमिष दाखवता येईल, किंवा तत्सम कुठलेही शासकीय निर्णय सरकारला घेता येणार नाहीत. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज अधिक आक्रमक झाला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मोठ्या सभेचं नियोजन केलं आहे. लवकरच सभेची तारीख आणि ठिकाण कळवू, असेही त्यांनी जाहीर केले. दुसरीकडे मराठा समाज आमदार, खासदार यांना आरक्षणावर प्रश्न विचारत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव खासदार महोदयांना पाहून आक्रमक झाल्याचं दिसून आलं. 

सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर हे मतदारसंघात कार्यक्रमानिमित्त जात असताना, काही मराठा समाज बांधवांनी त्यांना मराठा आरक्षणाबद्दल जाब विचारला. ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संगणमताने तुम्ही आम्हाला सगेसोयरेच्या अंमलबजावणीचा शब्द दिला होता. मात्र, आत्तापर्यंत त्या शब्दावर कुणी चकार शब्द देखील बोलायला तयार नाही. आचारसंहिता तोंडावर आहे, पण त्यावर अजिबात कोणीही बोलत नाही, म्हणजे हा शासनाचा मराठा समाजावर अन्याय आहे,'' असे म्हणत सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांना समोरासमोरच सुनावले. 

होय, ती क्लीप दाखवा

राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के मराठा आरक्षणात मेडिकलच्या जागा नाहीत. त्यामध्ये, जेईई इंजिनिअरींगच्या जागा नाहीत. शिवाय केंद्रात हे आरक्षण ओपनमध्ये गणलं जाणार आहे. मग, केवळ राज्यापुरतं आरक्षण देऊन डोळं पुसणार आहेत का, असा सवालही मराठा बांधवांनी खासदार महोदयांना केला. भाजपात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे, पण आपल्याला समाजाची तळमळ लक्षात येत नाही. तुम्ही सोलापूरमधून लोकसभेत मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करता. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तुम्ही संसदेत उपस्थित केला नाही, असेही या मराठा बांधवांनी म्हटले. त्यावर, मी मराठा आरक्षणावर बोललो आहे ती क्लीप पाठवतो, असे खासदार जय सिद्धेश्वर यांनी म्हटलं. त्यावर, आजपर्यंत ती क्लीप आमच्यापर्यंत आली नाही, असे म्हणत मराठा बांधवांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, सगेसोयरेची अंमलबजावणी होईपर्यंत, कुठल्याही खासदार, आमदारांना आम्ही कार्यक्रम घेऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

फडणवीस हेच मोदींचा करेक्ट कार्यक्रम करतील - जरांगे

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आज 'मोफत नोकरी महोत्सवा'चे उद्घाटन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांचं सध्याचं वागणं म्हणजे 'बुडत्याचे पाय डोहाकडे' या म्हणीप्रमाणे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हेच नरेंद्र मोदी यांचा करेक्ट कार्यक्रम करतील. माझ्यावर फुलं उधळणाऱ्या लोकांवर गुन्हे का दाखल केले जात आहेत? राज्य सरकार माझ्यावर इतकं का जळतं?" असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस तुमच्या जळण्याने काही होणार नाही. हे वर्तन गृहमंत्र्यांना शोभत नाही, असा टोलाही जरांगेंनी लगावला आहे.
 

Web Title: 'Yes, show clips from Parliament'; The Maratha brothers surrounded the MP of solapur jai sidheshwar from the reservation of maratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.