एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:28 PM2020-06-27T15:28:39+5:302020-06-27T15:33:57+5:30

सीबीएसई बोर्डाच्या एका निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशावेळी एका नव्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून राज्य सरकारसमोर सवाल उपस्थित केला आहे.

Will SSC board students lag behind in admission Due to that decision of CBSE Board? - Ashish Shelar | एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका

एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका

googlenewsNext
ठळक मुद्देसीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ थ्री नुसार गुण देण्याची योजना आखली आहेसीबीएसईच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ थ्रीनुसार गुण मिळणार, तर एसएससीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्ह नुसार गुण मिळणारमग एसएससी बोर्डाचे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशात मागे पडणार

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. दहावीचा भूगोलाचा पेपर वगळता राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा व्यवस्थित पार पडल्या असल्या तरी पेपर तपासणी आणि निकालाबाबत अनेक अडथळे येत आहेत. दरम्यान, आता सीबीएसई बोर्डाच्या एका निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशावेळी एका नव्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून राज्य सरकारसमोर सवाल उपस्थित केला आहे.

सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ थ्री नुसार गुण देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ थ्रीनुसार गुण मिळणार, तर एसएससीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्ह नुसार गुण मिळणार, मग एसएससी बोर्डाचे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशात मागे पडणार, अशी भीती शेलार यांनी उपस्थित केली आहे. सरासरी सरकारमुळे  एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार अशी टीका शेलार यांनी केली आहे.

तसेच राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील अव्यवस्थेवरून शेलार यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत महाविकास आघाडीच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांचा निर्णय कधी होणार?, शाळांनी शुल्कवाढ करु नये याबाबत घेतलेला निर्णय टिकला नाही. सरकारने न्यायालयात बोटचेपी भूमिका का घेतली? या अंतरिम स्थगितीला सरकार पुन्हा न्यायालयात आव्हान देणार ? की संस्था चालकांचा फायदा करणार? अशी विचारणाही शेलार यांनी केली.



अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षांबाबत देशपातळीवर एकसुत्री निर्णय व्हावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग निर्णय घेणार, अशा बातम्या आल्या तोपर्यंत महाराष्ट्रात गृहपाठ न करता घेतलेला निर्णय "जैसेथे"ठेवण्यास सरकार तयार नाही. गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा छळ कधी रोखणारमहाराष्ट्रात शिक्षणाचे एकुणच काय..? असा सवाल शेलार यांनी राज्य् सरकारला विचारला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पृथ्वीवर पुन्हा एकदा सामुहिक विनाशाचे संकेत, हे ठरेल कारण

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

Web Title: Will SSC board students lag behind in admission Due to that decision of CBSE Board? - Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.