ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये; मनसेचं शिवसेनेवर टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 11:16 AM2020-02-09T11:16:50+5:302020-02-09T11:18:55+5:30

तसेच शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे पाहून शिवसेनेला मतदान करत नव्हते तर बाळासाहेबांना मानणारे, त्यांच्या हिंदुत्वाकडे पाहून शिवसेनेला मतदान करत होते.

whose government is run by Ajit Pawar should not teach us; MNS criticizes Shiv Sena | ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये; मनसेचं शिवसेनेवर टीकास्त्र 

ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये; मनसेचं शिवसेनेवर टीकास्त्र 

Next
ठळक मुद्देथोड्या दिवसाने अजित पवार शिवसेना चालवतीलशिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे पाहून शिवसेनेला मतदान करत नव्हतेउद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक शिवसैनिक नाराज

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या दिशेने नव्या वाटचालीला सुरुवात केल्यानंतर शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकला ही बाळासाहेबांचीच भूमिका होती असं सांगत भगवी वस्त्र घातल्याने कोणी हिंदुत्व स्वीकारलं असं होत नाही, मनसेचा मोर्चा भाजपा पुरस्कृत आहे असा आरोप शिवसेनेने मनसेवर केला होता. यावरुन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. 

याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये, मुख्यमंत्र्यांकडे जेवढी गर्दी होत नाही तेवढी अजितदादांकडे असते. थोड्या दिवसाने अजित पवार शिवसेना चालवतील, सत्तेसाठी शिवसेनेने जी चूक केली आहे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे पाहून शिवसेनेला मतदान करत नव्हते तर बाळासाहेबांना मानणारे, त्यांच्या हिंदुत्वाकडे पाहून शिवसेनेला मतदान करत होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. शाखाप्रमुख ते सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे दुखावला गेला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम राज ठाकरे करत असतील तर हे शिवसैनिक काही दिवसांत मनसेत मोठ्या प्रमाणात प्रवेश करतील हे आगामी काळात दिसेल असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे. तत्पूर्वी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही शिवसेनेला प्रत्युत्तर देत शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम झाली आहे, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला होता.

दरम्यान, पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली १४ वर्ष मनसे कुठे होती? मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी शहा-मोदी यांना राजकीय पटलावरुन बाजूला फेका असं टोकाचा विरोध केला आता सौम्य झाले आहेत हे लोकांना दिसतं. हिंदुत्वाचा मुद्दा मनसेने कधी आणला नव्हता, भगवी वस्त्र घातल्याने कोणी हिंदुत्व स्वीकारलं असं होत नाही. लोकांनी भाषणात टाळ्या वाजवल्या, मनोरंजन केलं अशी खोचक टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी राज ठाकरेंवर केली होती.  

महत्त्वाच्या बातम्या

मनसेचा महामोर्चा : राज्यभरातून मनसैनिक हिंदू जिमखान्याच्या दिशेनं रवाना

'आज मनसेचा बुलंद आवाज मुंबईत घुमणार, या आणि सामील व्हा'

...म्हणूनच 'याचे' श्रेय गांधी-नेहरु अन् पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांना जाते - शिवसेना नेते संजय राऊत 

मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका 

हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर

Web Title: whose government is run by Ajit Pawar should not teach us; MNS criticizes Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.